Sant Santaji Maharaj Jagnade
मुर्तिजापूर तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा येथील संताजी सेना व तेली समाज मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यवतमाळ दि 22 फेब्रुवारी 2018 रोजी वणी येथे वणी तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा जि. धुळे येथे 8 फेब्रुवारी रोजी एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला.त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा
संत संताजी अध्यासन - तेली समाज
घोटी यथे तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा येथे एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला. त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा घोटी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ तेली समाज यांनी (दोंडाई) धुळे तेली समाजातील लहान चिमुकली वर झालेल्या आत्याचार बलात्कार प्रकरणी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
शिंदखेडा, दि.१९ (प्रतिनिधी) - दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाच्या नराधमास व त्यास पाठीशी घालणाच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा मोर्चा काढून रास्तारोकोचा इशारा शिंदखेडा तेली समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.