Sant Santaji Maharaj Jagnade
लोकांच्या घर बांधण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही संस्था कार्य करते. स्वत:चे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जागा मिळविण्यापासून घर बांधेपर्यंंत मोठे सोपस्कार असतात. त्यात अर्थसहाय्य असल्याशिवाय काहीच करता येत नाही. घरासाठी अर्थसहाय्य करणे, भूखंड योग्य किमतीत उपलब्ध करून तेथे नागरी सोई निर्माण करण्याचे कार्य संस्थेने केले आहे.
नागपुर सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. विवाहात प्रचंड खर्च होतो, त्यामुळे पालक हवालदिल होतात. अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांची आयुष्यभराची पुंजी मुलांच्या विवाहात संपून जाते. यावर तोडगा काढण्यासाठी संताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सामूहिक विवाहाची संकल्पना जवाहर विद्यार्थी गृहाच्या साह्याने तयार करण्यात आली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
तेली समाज महासंघ म्हणजे एक चळवळ आहे. तेली समाजाच्या सर्व नागरिकांची ही एक शीर्षस्थ संस्था आहे. शिक्षणाचे प्रश्न, नागरीकरणाचे प्रश्न आणि तेली समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंंत पोहोचविणे आणि न्याय मिळविण्यासाठी धडपडणे हे महासंघाचे कार्य आहे. तेली समाजातील लोकांना एकत्र करण्यासाठी आणि समाजाची बांधणी करण्यासाठी हे कार्य सुरू आहे.
नागपुर तेली समाज सभेच्यावतीने समाजातील महिला व विद्यार्थ्यांंसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांंना शैक्षणिक मदत करण्याचा मानस आहे. मिरची बाजार, इतवारी येथून हे कार्य करण्यात येत आहे.
समाजातर्फे (अंबाळा) रामटेक आणि गरोबा मैदान, नागपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आली आहे. व्यवसाय हा उद्देश यामागे नसून समाजातील गरीब नागरिकांना कमी दरात राहण्याची व्यवस्था करून देण्याचा मानस यात आहे. याचे अध्यक्ष हिरामण बावनकुळे, उपाध्यक्ष बळवंतराव ढोबळे आणि सचिव खुशालराव पाहुणे या धर्मशाळांचे व्यवस्थापन पाहत आहेत.