Sant Santaji Maharaj Jagnade
सर्वच विश्वस्त आसतात मुळात ही संस्था रजीस्टर नाही व रजीस्टर केली जाणार नाही. पावती नाही पैसे मागने नाही. ही वाटचाल वेगळी व आदर्श युक्त आहे. सदर कार्य काल सातत्याने परिपुर्ण व्हावा या साठी सर्वश्री रोहिदास हाडके, पाडुंरंग चव्हाण, हरिष देशमाने, विष्णू चव्हाण प्रकाश कोकणे, सुरेंद्र राऊत यांचा विशेष सहभाग आसतो.
यासाठी विविध कार्यक्रम राबविले गेलेे. संस्थेसाठी समाज बांधवांनी वाघोली येथे जागा घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही आणि कार्यकाल थांबू लागले. संस्था मान्यता थांबली म्हणनू पुन्हा सुरूवात केली. सर्वश्री सुभाष काका देशमाने, शिवाजीराव ठोंबरे यांच्या विचार प्रक्रियेतुन नवी संस्था उदयास आली आज श्री. पंडीतराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था रजीस्ट्रेशन सुरू आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महानगर पालीके बोहेरील या बांधवांचे अनेक प्रश्न होते हे सर्व जन पुणे महानगर पालिकेत नसल्याने ते पुणे समाज संस्थेत सभासद होऊ शकत नव्हते. मग यासाठी भैरोबा नाल्याच्या पुढील बांधवासाठी १९९५ मध्ये श्री संताजी तेली समाज संस्था हडपसर या नावाने कार्य सुरू झाले. या कार्याची संस्था झाली. या संस्थेला रजिस्टर करण्यात आले.
येथील श्री. माधवराव राऊत, रमेश राऊत, सुनिल राऊत, नगीने उबाळे या मंडळींनी संघटन सुरू केले समाजाचा फंड ही सुरू केला समाज संस्था जागा ही घेण्याची धडपड करीत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात संताजी उत्सव व हाळदी कुंकू सभारंभ साजरे केले जातात.
१९९९ मध्ये पुणे कॅम्प परिसरातील बांधवांनी संघटन सुरू केले. या संघटने तर्फे संत संताजी पुण्यतिथी साजरी करणे. खाने सुमारी करणे महिला साठी तिळगुळ समारंभ साजरा करणे इतर उपक्रम चलवतात. मंडळाचे सर्व सभासद अध्यक्ष असतात. असे श्री. गणेश भोज व श्री. संजय व्हावळ सांगतात.