Sant Santaji Maharaj Jagnade
वधु वर मेळावे काळाची गरज हा ही विचार अस्तीवात नव्हता तेंव्हा गणेश पेठेतील पांगुळ आळीतील शेलार वाड्यात कै. शंकरराव भाऊसाहेब कर्डीले रहात होते. तेव्हा पुण्याच्या प्रत्येक पेठेत समाज रहात होता प्रत्येकाच्या सुखात दु:खात समाज बांधव सामील होत होते बाहेरून आलेला समाज बांधव या प्रवाहात सामील होत आसे. कर्डीले तसे समाज विचाराचे आपले घर पाहुन ते ८२ भवानी पेठे येथे रोज जात. आजुबाजुच्या गावात ८२ पेठ मध्ये ही लग्न असेल तर हजेरी लावत. मग पत्रिका असो अगर नसो समाज लग्नातुन ते उपवर वधु वर शोधत.
कै. केशवराव भगतांच्या जवळ असल्याने त्यांना समाजाचा ओढा होता. याच मुळे ते लोकशाही मार्गाने समाजाचे अध्यक्ष ही झाले. यासाठी कै. आप्पासाहेब भगत, कै. विष्णूपंत शिंदे कै. जगन्नाथ व्हावळ यांनी साथ सोबत दिली. यांच्याच कार्यकाळात १९६१ मध्ये पुणे येथे महापूर आला या महापूरात शेकडो कुटूंबांचे संसार उध्वस्त झाले. घरेदारे जमीनदोस्त झाली. आशा वेळी धोमकर यांनी अध्यक्ष म्हणून पुढाकार घेऊन समाज कार्यालयात आसरा दिला. पुरग्रस्तांना मदत केंद्र सुरू केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
पुण्या परिसरातील पवार पुण्यात व्यवसायाने स्थीर झाले. आपला व्यवसाय संभाळत ते समाज कार्यात उभे राहिले ते दोन वेळा ८२ भवानी पेठे येथिल तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष होते. समाजाच्या कार्या बरोबरच त्यांचे इतर सामाजीक कार्य पुण्याचे वैभव म्हंटले तर योग्य ठरेंल स्वारगेट जवळील रेखीव नगर म्हणुन सुभष नगर म्हणून संबोधले जाते. त्याची उभारणी त्यांनी केली. पुणे सातारा रोड वरील आदर्श सोसायटी राजश्री शाहू सोसायटी ही त्यांचीच धडपड.
आशा बिकट परस्थितीत त्यांनी अध्यक्षपद स्विकारले. धर्मकारण व समाजकारण ही विचाराची बैठक पुर्वजांनी निर्माण करून वाढवलेली तीच पद्धत सुरू ठेवली राजकारण, अर्थकारण व समाजाकरण ही तेली महासभेची बैठक. या दोन्ही समाज संस्थेत समन्व्य साधुन जो सर्वाचा सर्वगटांचा, सर्व पक्षांचा म्हणजे समाजाचा भव्य महामेळावा झाला. तो यांच्याच काळात. स्वागताची, महाप्रसादाची जबाबदारी संस्थेकडे आली. लाखो बांधव एकाच वेळी पुण्यतिथीला येणे हा इतिहास घडवायचा होता.

संघटनेच्या माध्यमातुन समाज कार्य करत असताना आम्हाला जाती-जातीच्या भिंती उभ्या करावयाच्या नाहीत. भारतीय राज्य घटनेंशी आम्ही बांधील आहोत. जाती पोट-जाती निर्मुलन व जाती अंता साठी लढाई हे आमचे अंतीम उद्दीष्ट आहे. आमचे या तेली संघटनेचे कार्य म्हणजे, आमची ही न्याय हक्कासाठी ची, समता समानता प्रस्थापित करण्याची व परिवर्तनाची चळवळ आहे.