राजूर : श्री संताजी जगनाडे महाराज यांच्यामुळेच तुकाराम महाराजांची गाथा आपल्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या या कार्याची दखल केंद्र सरकारने व राज्य सरकारने घेऊन आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन एक ऐतिहासिक निर्णय झाल्याने महाराजांच्या कार्याचा गौरव झाला आहे. यापुढे तरुणपिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन राजूरचा सरपंच हेमलता पिचड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.
गतवर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मालेगाव शहरात विविध शासकीय / निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली. मालेगाव महानगरपालीकेत उपायुक्त श्री.विलास गोसावी यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी रमेश उचित यांनी संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते.तुकारामांची गाथा त्यांनी लेखणीबध्द करून अमर केली
लोहारा - समय सारथी राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती रविवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बसवंत बंगले हस्ते करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिपक मुळे, न. पं. गटनेते अभिमान खराडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,
तेली युवा संघ जालना कन्हैयानगर आयोजित तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज 396 वी जयंती महोत्सव दि. 8/12/2019 रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे. श्री संत शिरामेणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 वी जयंती निमित्त दि. 08/12/2019 रोजी भव्य मिरवणुक आयोजित केली जाणार आहे. सदर कार्यकमाची वेळ सायं. 5 वाजता, स्थळ विठ्ठल रूख्मिणी मंदीर, कन्हैयानगर, जालना ही राहील
राहुरी शहर: सर्व शासकीय व निमशासकिय कार्यालयामध्ये ज्या प्रमाणे थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केली आहे. त्या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात यावी असे परिपत्रक शासनाने काढून त्यास मान्यता दिल्याने या वर्षापासून संत जगनाडे महाराज यांची जयंती