लोहारा - समय सारथी राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती रविवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बसवंत बंगले हस्ते करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिपक मुळे, न. पं. गटनेते अभिमान खराडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,
तेली युवा संघ जालना कन्हैयानगर आयोजित तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज 396 वी जयंती महोत्सव दि. 8/12/2019 रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे. श्री संत शिरामेणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 वी जयंती निमित्त दि. 08/12/2019 रोजी भव्य मिरवणुक आयोजित केली जाणार आहे. सदर कार्यकमाची वेळ सायं. 5 वाजता, स्थळ विठ्ठल रूख्मिणी मंदीर, कन्हैयानगर, जालना ही राहील
राहुरी शहर: सर्व शासकीय व निमशासकिय कार्यालयामध्ये ज्या प्रमाणे थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केली आहे. त्या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात यावी असे परिपत्रक शासनाने काढून त्यास मान्यता दिल्याने या वर्षापासून संत जगनाडे महाराज यांची जयंती
उस्मानाबाद तेली समाज : संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कळंब येथे रविवारी (दि.८) जिल्हा समाज सेवाभावी संघ व उस्मानाबाद जिल्हा तेली समाज कळंब शाखेच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजनाबाबत कळंब शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक कोंडाप्पा कोरे, जिल्हाध्यक्ष रवि कोरे, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके आदींची उपस्थिती होती.
दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आहे प्रती वर्षी प्रमाणे या ही वर्षी भव्य दिव्य अशी वहान रॅली श्री संस्थान गणपती येथुन सकाळी ९ वा. काढण्यात येणार आहे. तसेच संताजी महाराज यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व तेली समाज बांधवानी सहकुंटुब सहपरिवार जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक - तेली समाज संभाजीनगर