तैलिक महासभा ही कै. माधवराव पाटील दिग्रस यांनी महाराष्ट्रात उभी केली ते आमदार होते त्यामुळे त्यांनी आपली ताकद या साठी वापरली. माधवराव पाटील यांचा नाते संबंध जुना कारण माझे आजोळ त्याच ठिकाणी. यामुळे ते पुण्यात जेंव्हा तेली समाज संघटित करण्यास येत तेंव्हा कै. अमृतशेठ पन्हाळे हे माझे वडील व ते एकत्र चर्चा करून समाज संघटीत करीत होते.
ब्राम्हणी विचाराने या देशाला सामाजीक, राजकीय गुलामगीरी दिली होती ती नष्ट करण्यासाठी संतानी या ब्राम्हणशाही बरोबर संघर्ष उभा केला होता. तो संघर्ष बोथट करून संतांना एका चौकटीत बसवले. पेशवाईत हे कार्य राबवले गेले. सामाजीक समतेला शीवाय देश बलवान होणार नाही या साठी महात्म फुले यांनी संघर्ष केला. हाच विचार तेली समाजातील महापुरूषाने कृत्तीत उतरवला त्या महापुरूषाचे नाव तमभळनाडू मधील परिवार रामा स्वामी होय.
मी संत संताजी बोलतोय ! भाग 2 - लेखक मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुकाराम काय किंवा मी काय ? शुद्र ठरविलेले. वेद आमच्या साठी नव्हते राज्य कारभार आमच्या कडे नव्हता. न्याय निवाडा आमच्याकडे नव्हता. आम्ही कष्टकरी आम्हाला तो अधिकार इथल्या व्यवस्थेने नाकारला होता. या बद्दल बोलाल तर शिक्षा ही त्यांनी तयार केलेल्या धर्मग्रंथाच्या पाना पानात लिहिली होती.
विचार मंथनातून समोर आलेले सत्य श्री. संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे, तेली संस्था सुदुंबरे ट्रस्ट, नवीन कार्यकारणी (2017/2021) साठी तयार झाली त्याबद्दल सर्व समाजबधवांना मनापासुन खुप आनंद झाला. तसेच सर्व नवीन कार्यकर्णीस मनापासून हार्दिक शुभेच्छा ! सर्वांचे मनस्वी अभिनंदन !
वाचनिय अशीच संजय येरणे लिखीत कादंबरी. संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने भरारी प्रकाशन नागभीड द्वारा नवखळा तह. नागभीड जि. चंद्रपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना संजय येरणे लिखित, शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणा-या संतसूर्य संताजीच्या पत्नी यमुनेच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी प्रकाशित केली.