पिंपरी - आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात मराठा समाजाने काही लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने हवेली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली.
गडचिरोली - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री जयरत्न क्षिरसागार व युवा आघाडी अध्यक्ष आ. संदिप क्षिरसागर यांचे निवासस्थान, गाड्या व कार्यालय तसेच आ. प्रकाश सोळंके व प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड व आग लावणाऱ्यांचा निषेध करुन त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी
नागपूर: विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेवराव हटवार लिखित "डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य " या पुस्तकाचे प्रकाशन सेवादल महिला महाविद्यालय येथे करण्यातआला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. संजय ढोबळे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ
अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर, कार्यालयावर व कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांना त्वरीत अटक कारवाई करावी यासाठी येथील तेली चौधरी समाजातर्फे तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड येथील घरावर भ्याड हल्ला करण्यात आला.
शिरपूर । अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी नेते, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या घरावर, कार्यालयावर व कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करून कार्यवाही करावी अन्यथा संपूर्ण राज्यात प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रदेश तेली महासंघ युवा प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकारी यांनी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला.