Sant Santaji Maharaj Jagnade
दिनांक ८ डिसेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम कन्नड शहरात आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास आपली, आपल्या संपूर्ण परिवाराची उपस्थिती प्रार्थनिय आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे या सोहळ्यास आपल्या घरातील लहान-मोठ्या प्रत्येक सदस्याची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
श्री संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव सोहळा दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी दु. ४.०० वा. जयंती पालखीचा मार्ग : पंचवटी कारंजा पासून वालझाडे मंगल कार्यालय, जुना आडगांव नाकापर्यंत सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती करण्यात आलेली आहे.
संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम, दिनांक :- ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता. स्थळ जि.प.उच्च प्राथमिक शाळा, वालसरा चे भव्य पटांगनात, उद्घाटक :- मा. श्री. मधुकर केशवरावजी भांडेकर युवा सामाजिक कार्यकर्ता यांचे शुभ हस्ते
श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा अंबाळा (रामटेक) श्री संताजी स्मृती मंदिर व स्व. श्री नामदेवराव रोकडे सांस्कृतिक सभागृह, गरोबा मैदान, छापरुनगर, नागपूर - ४४०००८ वार्षिक आमसभा रविवार दि. २६/११/२०२३ वेळ : दुपारी ४.०० वाजता स्नेह-संमेलन सोमवार दि. २७/११/२०२३ वेळ : सकाळी १०.०० ते १२.०० वाजे पर्यंत, स्थळ अंबाळा (रामटेक) येथील धर्मशाळेचे सभागृह.
संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी ता. चामोर्शी, जि. गडचिरोली चे वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन कार्यक्रम दिनांक ०८ डिसेंबर २०२३ (शुक्रवार) दुपारी १२.०० वाजता स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी. कार्यक्रमाचे अध्यक्ष ... मान. ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक. यशस्वी उद्योजक, टिमकी- भानखेडा, नागपूर.