सर्व वारकरी समाज, बांधव, देणगीदार व अन्नदाते, यांच्या सहकार्यातुन पंढरपूर येथील संस्थेच्या मालकीच्या जागेवर नियोजीत श्री संताजी सांस्कृतिक भवन इमारतीचा भुमिपूजन समारंभ आषाढ शु. १० शके १९४५ बुधवार दिनांक २८/६/२०१३ रोजी सकाळी ११-०० वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
गोंदिया - भारतात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विपरीत परिणाम भारतातील प्रत्येक नागरीकावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगात प्रथम क्रमांकाचा देश असून भारतात अनेक तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटत आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धा, धर्मवाद, भाषावाद,
नागपूर:- विदर्भ तेली समाज महासंघ आणि शंबुक संताजी डॉ मेघनाथ साहा प्रबोधन मंच आणि अमर सेवा मंडळ नागपूर द्वारा आयोजित विद्यापीठ स्तरीय विविध प्राधिकरणावर निवड नियुक्त झालेल्या सन्माननीय सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम कमला नेहरू महाविद्यालयाचे सभागृह सक्करदरा चौक नागपूर येथे
पुणे, ता. ६ : लोणी काळभोर येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे 'स्कील सेंटर' उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली. पुण्यात तेली समाजाचे सुमारे लाख नागरिक राहत असून, त्यांना या सेंटरचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ - अखिल भारतीय तैलिक महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील मनोज संतान्से यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.