आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.
अमरावती दि. २४ : आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनात युवा पिढीने समाज तसेच परिवारातील अडचणी समजून घेत संस्कृती व संस्कार जपण्याची गरज आहे. शिक्षण हे संस्कार पेक्षा मोठे नाही, ही बाब लक्षात ठेवून युवा पिढीने मार्गक्रमण केल्यास समाजासोबतच परिवार टिकेल आणि परिवार एकसंघ राहील,
कोरपना श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलिक विकास संस्था कोरपना यांच्या वतीने नुकतेच संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कोरपना शहरात मोठ्या भक्तीभावाने आयोजित करण्यात आली. यानिमित्य श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी राम मंदिर ते नवनिर्मित संत संताजी जगनाडे महाराज मंदिरापर्यंत काढण्यात आली. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली.
तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी शुभगंधा मंगल कार्यालय मु. पो. लोवले मयूर बाग स्टॉप संगमेश्वर देवरूख रोड ता. संगमेश्वर येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या तेली समाज वधु वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा अध्यक्ष माननीय खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह, स्थळ - श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, बाभुळगांव रोड, लासुर स्टेशन, • प्रारंभ • मित्ती मार्गशिर्ष कृ. ९ दि.०५/०१/२०२४ शुक्रवार • सांगता • मिती पौष शु. १ दि. १२/०१/२०२४ शुक्रवार, मार्गदर्शक - ग्रामस्थ भजनी मंडळ व श्री संताजी महाराज भक्त परिवार, लासुर स्टेशन