रत्नागिरी तेली समाज उन्नती संघ चिपळूण व गुहागर यांस तर्फे मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2018 रोजी महाशिवरात्रि स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर संमेलन हे विजय कृष्णाजी रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तर समान्य विशेष प्रमुख अतिथी श्रीमान शरद सुभाष तेली, उपनगराध्यक्ष बदलापूर असतील.
रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था या समाज संस्थेचा कार्यक्रम दि.२८ जानेवारी २०१८ रोजी रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व स्नेहसंमेलन सोहळ्या निमित्त संस्थेच्या वतीने समाजबांधवान करिता विद्यार्थी गुणगौरव, जेष्ट समाज बांधवाचा सत्कार, हळदी-कुंकू, इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आता आपली जात कोणती ? ( भाग 5 )
या देशाचे पंतप्रधान असलेल्या मा. नरेंद्र मोदींच्या लहान बंधूनी उत्तर पद्रेशात सांगीतले आता आपण सर्व पोटशाखा विसरू देशातील जगातील सर्व हिंदू तेली एक होऊ व जगाला पटवून देऊ जग कवेत घेणार्या मा. नरेंद्र मोदी यांचा हा मोदी तेली समाज आहे.
आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी 19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्यात व्यक्त केले.
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी, कोरा, ता. समुद्रपूर येथे तेली बांधवांच्या वतीने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम व तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मा. श्री रामदासजी तडस, खासदार, वर्धा जिल्हा, मा.श्री अतुलभाऊ वांदिले, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्हा व अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती.