श्री देव कलेश्वर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
श्री देव कलेश्वराचा इतिहास जूना असला तरी त्याचे कागदोपत्री बऱ्याच वेळा नावे बदलली गेली असे दिसून आले येथील वेंगुर्ला गावी तेली समाजाचा विस्तार पहाता पूर्वी सगळ्यात माेठा समाज वेंगुर्ला ग्रामी होता असे असले तरी आजची वस्ती हि किरकोळ दिसून येते. पूर्वीच्या काळी आजची भूजनागवाडी येथील श्री देव कलेश्वर मंदिर हे तेली समाजाचे श्री देव कलेश्वर मंदिर म्हणून प्रसिध्द होते. वस्तूस्थिती अशी आहे की त्या मंदिराचे खरे नाव कुळकार देवस्थान म्हणूनच होते.
देवगड तालुक्यातील हिंदळे येथील तेली समाज बांधवांचे दैवत श्री भवानीमातेचे हिंदळे राणेवाडी येथेमंदिर आहे. येथे दर तीन वर्षांनी श्री देवी भवानी मातेचा गोंधळ उत्सव असतो. या उत्सवासाठी हजारो तेली बांधव उपस्थित असतात. मुंबईकर
देवगड तालुक्यात तोरसोळे येथे एकमेव तेली समाज मंदिर आहे. या मंदिरामध्ये संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असून त्याची नेहमी पूजाअर्चा केली जाते. येथील तेली बांधवांनी एकत्र येऊन हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात येथील समाजाचे वार्षिक उत्सव होतात.
तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली
कणकवली तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच येथील वृंदावन हॉलमध्ये झाली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, मधुकर बोर्डवकर, अप्पा तोटकेकर, आबा तेली, नंदू आरोलकर व इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
जय संताजी तेली समाज सेवा संस्था (चेंबूर, उपनगर) या संस्थेच्या वतीने या वर्षी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व स्नेह संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२० रोजी सायं. ४.३० ते ८.३० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे.