Sant Santaji Maharaj Jagnade देवगड तालुक्यातील जामसंडे वेळवाडी (मळई) येथील तेली समाज बांधवांचे जामसंडे - विजयदुर्ग सागरी महामार्गावर जामसंडेपासून सुमारे ४ किमी अंतरावर श्री मेळेकर देवस्थान आहे. जामसंडे गावच्या बारा रहाटीमध्ये पूर्वी तेली हा मानकरी होता.
देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी येथील श्री आप्पाजी वाडेकर यांनी बांधलेले हे हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो.
श्री. बाळकृष्ण दाजी किंजवडेकऱ्यांचे किंजवडे - लिंगडाळ मार्गावर गणेशमंदिर भाविकांच्या भक्तिभावाला 'नवतेज' देते.
किंजवडे येथील श्री भवानीमाता मंदिर - देवगड तालुक्यातील किंजवडे तेलीवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या भवानीमातेचे मोठे मंदिर गतवर्षी उभारले आहे. लाखो रुपये खर्च करुन हे मंदिर उभारले आहे.
कुडाळ तालुक्यातील आकेरी गावात होळीपूर्वी दोन दिवस धालोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. या गावात तेलीवाडीने 'धालो' हि परंपरागत उत्सवाची जपणूक केली आहे.