कणकवली, ता. २९ : खेडोपाडी वाहतुकीच्या साधनांची कमतरता, प्रसंगी पाच ते सात कि.मी. प्रवास करून शिक्षण घेणे अशा अनेक प्रतिकूल आव्हानांवर मात करून आपले धेय्य गाठणारी मुलेच भविष्य घडवतात, असे मार्गदर्शन मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे गोविंद कामतेकर यांनी केले.
सालाबादप्रमाणे कोकण स्नेही ट्रस्टच्या समस्त सभासद, पालकांना कळविण्यात येते की २०२०-२१ ह्या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदविका मिळविलेल्या आपल्या पाल्याची मार्कशीट (झेरॉक्स ) सेल्फ अटेस्टेड करुन मागच्या बाजूला पालकाचे नांव , पत्ता व फोन नंबर लिहून श्री . श्रीकृष्ण तळवडेकर, चिटणीस, फ्लॅट नं. ३२, पद्मावती सोसायटी, पद्मावतीदेवी मार्ग, आय.आय.टी. मार्केट, पवई, मुंबई ४०००७६ यांच्याकडे ३१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत.
पाटण, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साई मंदिर, पाटण येथे भक्तिमय व भाविकांनी साध्या पद्धतीने व कोरोना संसर्गाचे असणारे नियम व अटींचे पालन करत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.
सुतारवाडी : रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथील समाजाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. दरवर्षी अत्यंत उत्साही वातावरणात आणि असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साधेपणात समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल,पनवेल तेली समाज युवा विचार मंच, जिजाऊ महिला मंडळ पनवेल व कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या वतीने श्री. शनैश्वर मंदिर टपाल नाका पनवेल व पनवेल महानगरपालिका कार्यालयात