तेली समाज शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ, पंचवटी श्री संताजी मित्र मंडळ, पंचवटी व रणरागिणी महिला मंडळ, पंचवटी तैलीक महासभा, पचंवटी द्वारा आयोजित संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती समारोह. कार्यक्रमाचे ठिकाण : सिनर्जी हॉस्पिटल जबळ, गिता नगर, म्हसरुळ, पंचवटी, नाशिक दिनांक : रविवार ८ डिसेंबर २०१९
श्रीरामपूर तेली समाज - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालयांनी जयंती साजरी झाल्यानंतर संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा कार्यालयात दर्शनी भागात लावावी, अशी मागणी पत्रकाद्वारे श्रीसाई संताजी प्रतिष्ठान शिडी, अहमदनगर यांनी केली आहे. संबंधित कार्यालयाला श्री संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.
सनई - १२ ऑक्टोबर २०१९ रोजी साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्याचे श्री.क्षेत्र शिर्डी ता. राहता, जिल्हा-नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका विवाह समारंभात वधू-वर नाव नोंदणी फार्म देऊन एक आगळे वेगळे नाव नोंदणी अभियान नाशिक
साई संताजी प्रतिष्ठान अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्यावतीने शिर्डी येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यासाठी समाजातील वधू-वरांनी नाव नोंदणीचे आवाहन महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांनी केले आहे.वृदावन मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तेली समाजातील महान विभुती (भाग 1) सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
जोगा परमानंद
संत नामदेवांचे गुरू म्हणुन प्रसिद्ध असलेले महापुरूष भाई जोगा परमानंद. हे तेली ज्ञातीतील होते. संत नामदेवांच्याआधी त्यांनी उत्तर भारताचा दौरा केला होता. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिब या धर्मग्रंथात त्यांच्याही काही रचनांचा समावेश आहे. जोगा परमानंद हे अतिशय उच्च दर्जाचे कवी होते.