जाऊ संताजींच्या गावा .. !
श्रावण मास श्री संताजी महाराज जगनाडे समाधी मंदिर सुदुंबरे येथे ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन व किर्तन सोहळा. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दु.१२ ते १ गाथा भजन सायं.४.३० ते ५.३० हरिपाठ, ५.३० ते ७ संगीत भजन व रात्री ७ ते ९ हरिकिर्तन व नंतर हरिजागर होईल. प्रारंभ मिती श्रावण वद्य.10. रविवार दि. 25/8/2019 तर सांगता मिती श्रावण वद्य.१३.बुधवार दि.२८/८/२०१९ रोजी होईल
संताजी मंडळ, नाशिक जिल्हा - आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार दि. १८ ऑगस्ट २०१९ रोजी दु.२.०० वाजता रोटरी क्लब हॉल गंजमाळ बसस्टॉप समोर, नाशिक - १ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य समाजसेवी संस्था, संताजी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा ३९ वा गुणगौरव समारंभ याही वर्षी आयोजित केला आहे. सदर समाजप्रेरक सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सर्वां तेली समाज बांधवाना निमंत्रीत करण्यात आलेले आहे
नेवासा : तिळवण तेली समाजाच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात संत संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ही प्रतिमा देण्यात आली. यावेळी शिवाजी देशमुख महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी सभापती सुनीता गडाख यांचा तिळवन तेली समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सम्पूर्ण भारत में करोड़ों तेली, मोढ़, मोदी, घांची, गुप्ता, राठौर, गाण्डला, वनियार, चेट्टी, साहू समाज के विकास एवं उत्थान के लिए शतत प्रयास करने वाला सशक्त संगठन राष्ट्रीय तेली साहू महासंगठने दिल्ली का राष्ट्रीय अधिवेशन एवं वार्षिक समारोह महाराष्ट्र की पावन भूमि साई बाबा की नगरी, साईं पालखी निवारा, नगर मनमाड़ रोड, नीमगांव निघोज, शिर्डी महाराष्ट्र में दिनांक ८ सितंबर २०१९ दिन रविवार को आयोजित किया गया है।
औरंगाबाद काही दिवसांपूर्वी काचीवाडा येथील तेली समाज भगिनीला मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या युवकाने शिवीगाळ करून धक्का बुक्की केली होती व त्यांच्या मुलालाही मार लागला होता.सदरील घटना समजताच तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व सुनिल क्षीरसागर यांनी सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दादासाहेब शिंनगारे यांना भेटुन आरोपीला लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली होती