Sant Santaji Maharaj Jagnade
सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
औरंगाबाद तेली समाज - दरवर्षी प्रमाणे तेली युवा संघटनेतर्फे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त खोकडपूरा येथून तिळवण तेली समाज मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष भाऊ देशमाने, हरिश भाऊ चौधरी, दीपक भाऊ पाखरे,चौधरी काका, योगेश भाऊ शेलार, संतोष भाऊ सुरूळे , तेली युवा संघटनेचे उपाध्यक्ष ईश्वर पेंढारे ,संतोष सुरूळे कृष्णा पेंढारे,
नगर - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच रोहिनी कुसमुडे, तेली समाज आध्यक्ष तात्यासाहेबडोळसे, माजी सरपंच कृष्णा पेटारे, सारंगधर पटारे, ग्रापंचयातसदस्य राजुसाळके, श्रीकांत साळुके, राजेंद्र डोळसे, पोपट डोळसे, राहुल साळुके, अधीक्षक भाऊसाहेब ढोकणे आदी उपस्थित होते.
मालेगाव : महानगर तेली सम ज, व श्री संताजी महाराज उत्सव समिती तर्फे अंबिका मंदीरात संताजी जयंती साजरी करण्यात आली.तसेच गतवर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मालेगाव शहरात विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली.
श्रीगोंदा तेली समाज - राष्ट्र संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती श्रीगोंद्यात उत्साहात साजरी करण्यात आली. तेली समाजाच्या वतीने जगनाडे महाराज यांची प्रतिमा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना समाजाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राऊत यांच्या हस्ते भेट देण्यात आली. शनी मारुती मंदिरात देखील जयंतीचा कार्यक्रम पार पडला. येथील नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली.