बीड जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वषीं तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रिय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तरी सर्व सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी मधील ज्या उतीर्ण विद्याथ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व पालकाचा पत्ता,संपर्क क्रमांक देवून आपले नाव नोंदणी करावी.
राज्यात आज अनेक संस्था विविध उपक्रमांतून समाजाची सेवा करत आहेत. त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. अशा संस्थांचा संताजी सेवक संस्थेच्या वतीने गौरव करून त्यांना त्यांच्या कामास प्रोत्साहन देत आहे,' असे प्रतिपादन पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देशमाने यांनी केले. पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेच्या वतीने अहमदनगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार अध्यक्ष मोहनराव देशमाने यांच्या हस्ते सचिव प्रभाकर देवकर व खजिनदार प्रसाद शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रभाकर देवकर, प्रसाद शिंदे आदींची भाषणे झाली.
श्री शनैश्वर प्रतिष्ठाण, परळी वैजनाथ द्वारा आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा २०१९ तेली समाजातील सर्व पोट जातीतील उपवर वधु-वर संशोधनार्थ पालकांच्या होत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी परळी वैजनाथ, जि.बीड येथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. स्थळ : शलगे गार्डन, वैद्यनाथ मंदिर जवळ, परळी वैजनाथ. रविवार, दि.७ एप्रिल २०१९ सकाळी १० ते ४ पर्यंत.
प्रती वर्षी प्रमाणे जामनेर तालुका श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निर्मीत्त पहूर येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रम गुरूवार दि. 27 डिसेंबर 2018 रोजी वाघुर नदीच्या वर, भवानी मंदीर, पहूर - कसबे, ता. जामनेर येथे संपन्न होणार आहे तर दिपप्रज्वलन व कलश पुजन सकाळी 9 वा. दैनिक कार्यक्रम दि. 27/12/2018 ते 3/1/2019 पर्यंत
तारकेश्वर भैरव प्रतिष्ठान आयोजित गुरुदेव संत नारायण बाबा तारकेश्वर गड यांच्या प्रेरणेने सुरू झालेला व सतत 29 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा मार्गशीर्ष कृष्ण 13 शके 1940 गुरुवार दिनांक 3-1-2019 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक संत पूजन तसेच ध्वजारोहण