बीड :- जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार तेली समाज भुषण व अखिल भारतीय तैलिक साहु महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक तेली महासभा व युवक महासभा, निफाड तालुक्याची आढावा बैठक व कार्यकारणी नियुक्ती बैठक 27/6/208 रोजी संताजी मंगल कार्यालय, ओझर येथे पार पाडली. मार्गदर्शन करताना डॉ. महाले साहेब, करांकळ साहेब, कर्डीले साहेब, कर्डीले ताई ( मा.उपनगराध्यक्ष निफाड),
पाथर्डी तालुक्याच्या संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील पार्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संदीप बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. संताजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी ही निवड जाहीर केली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करू असे तालुकाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर बनसोड यांनी सांगितले.
शेवगाव तालुका संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी येथील गोपाळ शिदे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू असे शिदे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व तेली समाजातील मार्गदर्शक सोमनाथ बनसोडे (रा. दाढ बु.) यांची पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तेली समाजाचे तिर्थ श्रीक्षेत्र संत संताजी महाराज देवस्थान समितीच्या कार्यकारिणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.