प्रांतिक तैलिक महासंघ तेली समाजाच्या नेवासा शहराध्यक्षपदी बंडू जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांना जिल्हाध्यक्ष भागवन लुटे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. | प्रगतिशील शेतकरी पुरुषोत्तम सर्जे यांना सार्थ गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल याप्रसंगी त्यांना सन्मानित करण्यात आले. या बैठकीला युवा जिल्हाध्यक्ष विलास वालझाडे, जिल्हा सचिव रवींद्र करपे, नंदू लुटे, रुपेश वालझाडे, प्रशांत लुटे, युवराज सोनवणे,
जुन्नर मध्ये तिळवण तेली समाज मंडळाकडून यावर्षी श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगोत्सवानिमित्त रोज होणाऱ्या महाआरती मध्ये उपस्तीत महिलांची लकी ड्रा पद्धतीने चिट्टी काढली जाते आणि विजेत्या महिलेला "मानाची पैठणी" दिली जाते.
21 सप्टेंबर 2018 रोजी समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या सेवेबद्दल २ पैठणी लकी ड्रा ची सोडत करण्यात आली.
सेवेकरी पैठणीच्या मानकरी -
शनीशिंगणापूर - अकोले तालुक्यातील राजूर येथून सालाबादप्रमाणे तेली समाजाची तेल व पंच नद्यांचे पाणी घेऊन निघालेल्या तेल कावडीचे पवित्र श्रावण महिन्यात मंगळवार दि. ४ रोजी शनीशिंगणापूरकडे प्रस्थान झाले असून ही कावड़ यात्रा शुक्रवारी शनिशिंगणापूर येथे पोहचणार आहे. ही तेल कावड महाराष्ट्रात एकमेव असून कावडीचे तेली समाज बांधव व सर्व समाजातील शनिभक्त तेल अर्पण करून दर्शन घेऊन ठिकठिकाणी स्वागत करतात.
नगर शहरातील प्रसिध्द उद्योजक समाजभूषण मा श्री.अरविंदशेठ दारुणकर यांनी आपल्या कन्येच्या विवाहसोहळ्यात उपस्थित सर्वच मान्यवरांचा मानसन्मान राखत सत्कार सोहळ्यातील हार-तुरे आणि फेटे शाली वगैरेंना फाटा देत त्या रकमेतून वांबोरी येथे निर्माण होत असलेल्या संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे भवन या वास्तूच्या बांधकामासाठी ११,१११ रुपयांचा धनादेश प्रदान केला.वांबोरी तेली समाजाच्या वतीने आदिनाथ मोरे,प्रशांत साळुंके, अरविंद मोरे आणि महेश साळुंके यांनी त्याचा स्वीकार केला.
उस्मानाबाद जिल्हा तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम तसेच समाज मेळावा आ. जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित संपन्न झाला. यावेळी तैलिक साहू सभेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हासचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले ,लोहारा तालुकाअध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उमरगा तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी,