महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासाचा ठेका घेतलेली संघटना व या संघटनेचे हाय कमांड ते पदाधिकारी एका तालात एका सुरात नेहमी एकच गाणे वाजवतात. आम्ही बारा टक्के आहोत. आम्ही तुमचे बारा वाजवु शकतो. या गाण्यातील हे जे कडवे आहे. ते मात्र सत्य आहे. कारण या कडव्यात खरी ताकद आहे. पण जसे हे गाणे लांबत जाते तसे समाजाचा शेवटचा बांधव त्याच गाळात अधीक रुतु लागतो. तेंव्हा उरते फक्त कडवे आणी याचा गाभा हवेत विरला जातो.
नेवासा - येथिल अडत व्यापारी श्री. देवीदास सदाशीव साळुंखे यांची भानस हिवरेया ग्रा. पं. मध्ये नुकतीच निवड झाली आहे. नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर संचालक म्हणुन आमदारांनी शिफारस केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड मार्केट कमिटीवर केली आहे. या पुर्वी या मार्केट कमीटीच व्हाईस चेअरमन ही होते. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
चाकण :- समाज संघटन करून नेतृत्व साकारलेल्या सौ. निता करपे यांची निवड श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नुकतीच त्यांची निवड झाली.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा शनि मंदिर, परळी वैजनाथ, बिड येथ्ो तेली समाज,तेली युवक संघटना, श्री शनैश्वर प्रतिष्ठाण परळी वैजनाथ यांच्या तर्फे आयोजीत करण़्यात आला होता.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भ्ााग 1) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
शैक्षणीक स्वातंत्र्य, धनसंचय स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य सामाजीक स्वातंत्र्य, शेवटी राजकीय स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असेल तर माणुस माणुस म्हणुन जगु शकतो. देवाचा जो अभास करून भव्य दिव्य उभे केले जाते. त्यात माणसाचे मोठे पण दाखवले जाते. यापेक्षा अतीउच्च स्वातंत्र्य. संत जोगा परमानंद यांच्या कडे जाण्यापुर्वी यादव कालिन एक प्रसंगाची तोंड ओळख मांडतो. तेली समाजाच्या मतावर निवडूण गेलेल्या मा. फडवणीस यांनी बाबासाहेब पुरंदरे या नावाच्या ब्राह्मण्याला प्रतिष्ठा देऊन इतरांना तुच्छतेत ठेवणार्याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला. त्यांचे शिवचरित्र डोळस पणे पाहिले तर समजुन येईल त्यांनी शिवाजी राजांना स्वातंत्र्यासाठी मदत करणार्या मध्ये बारा बलुते आलुते व दलित आशा एकशे चव्वे चाळीस मंडळीं साठी एका हाताच्या बोटावर मोजता येणार नाही एवढी पाने खर्च केली नाहीत. परंतू ब्राह्मण्याचे उदात्तीकरण कण्यासाठी शेकडो पाने खर्च केलीत.