नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 2) - मोहन देशमाने
तेली समाजाच्या आघाडीच्या मासीकात परवा एक लेख वाचला तेंव्हा मला जानेवारी 2014 मधील प्रसंग आठवला. तो प्रसंग घडला तेंव्हाच सांगीतले विचार दडपू नका कारण हे बुमर्यांग तुम्हाला ही दडपुन टाकेल. रहाता जि. नगर येथे श्री संत संताजी पुण्यतीथी होती. जिल्हा पातळी वरील नेते हजर होते. ही घटना घडण्यापुर्वीची समाज अवस्था पाहू विकासाचा महापुरूष म्हणून त्यावेळचे गुजराथचे मुख्यमंंत्री मा. नरेंद्र मोदी भावी पंतप्रधान म्हणून समोर होते. ते जन्माने तेली आहेत. आणी याच वेळी भाजपाने त्या त्या जातीतले नेते निवडून त्या जाती आपल्या पंखा खाली घेण्यास महा रस्ता निर्माण केला होता.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 3) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
मेघनाद यानें शिक्षण न घेता आपला किरणा दुकानदारीत लक्ष घालावे असे त्यांच्या वडिलांचे विचार पण आपले मोठे बंधू जयंत व प्राथमिक शिक्षक यांच्या प्रयत्नाने व प्रेरणेने डॉ. मेघनाद यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणास गती मिळाली. शिवरातली गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती म्हणून गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिमुलीया येथे माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना डॉ. अनंतकुमार दास यांच्या कडे रहावे लागले. डॉ. अनंतकुमार दास यांनी त्यांची मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली.
शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या सामाजीक, आर्थिक व धार्मिक परंपरेत दहशद मरजवणार्या ब्राह्मणी व्यवस्थेला हादरे देऊन बहुजन वर्गाला खंबीर करणारे संत संताजी श्री. संत संताजींच्या या महासंग्रामाला साथ सोबत देणारी त्यांची पत्नी खेडच्या कहाणे घराण्यातील. याच खेड म्हणजे आजच्या राजगुरूनगर मध्येच जन्मलेले व या मातीशी एकरूप झालेले श्री. दिलीप पोपटराव लोखंडे होत. खेडच्या सरदार चौकातील वेसी जवळ जगण्यचे साधन म्हणुन किराणा दुकान सुरू केले. समजण्याचे वय सुरू झाले तेंव्हा पासून पुड्या बांधणे विक्री करणे. गिर्हाईक संभाळणे हे संस्कार शालेय शिक्षणा बरोबर सुरू होते. गावातल्या शाळेतच 11 वी शिक्षण पुर्ण झाले. आणी मित्रा सोबत खेळ व इतर सामाजीक कामात रमता रमता ते व्यवसायात लक्ष देऊ लागले. सोबतीला दोन भाऊ व दोन बहिणी होत्या त्यांची जबाबदारी ते पुर्ण करीत होते
श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड हि मान्यताप्राप्त संस्था असुन संस्थेची सभासद संख्या दोन हजार पर्यंत आहे. संस्था दरवर्षी 26 जानेवारी ह्या दिवशीच हा कार्यक्रम आजपर्यंत घेत आलेली आहे. आणि या कार्यक्रमाची पुर्ण कल्पना पुणे परिसरातील सर्व समाज बंधु भगिनींना असल्यामुळे सर्वजन कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचे पत्रक वगैरे न काढता फक्त कार्यक्रमाचे स्थळ वेळ मॅसेज द्वारे पाठवीले जाते.
उमेदीच्या काळात नगर शहरात आपला ठसा उमटवल्या नंतर ते व श्री. गोकूळ काळे हे श्री क्षेत्र सुदूंबरे संस्थेत पदाधीकारी म्हणून कार्यरथ झाले. संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ कामकाज पाहिले. याच दरम्यान कै. केशरकाकु क्षिरसागर यांचा संबंध आला. महाराष्ट्रात प्रथम नगर शहरात त्या खासदार होताच जंगी सत्कार केला. केशरकाकु महाराष्ट्र तेली महासभेच्या अध्यक्षा होत्या. विदर्भात रूजलेली ही संघटना मराठवाड्यात नावा पुरती होती. पण हीच संघटना उरलेल्या महाराष्ट्रात नावा पुरती ही नव्हती. अहमदनगर शहरात देशपातळीवरील मिटींग 1994 च्या दरम्यान आयोजित करण्यात कै. प्रकाशशेठ यांनी पुढाकार घेतला. याच जाहिर मिटींग मध्ये काकु देशपातळीवर अध्यक्षा झाल्या.