ही गोष्ट असेल 25 वर्षापुर्वीची त्या वेळी सुदूंबरे येथे जाण्यास वहातुक साधने विरळ होती. संचालक मंडळ मुक्कामास आसे. मी ही मुक्कामास जाऊ लागलो. पांढरा स्वच्छ लेंगा शर्ट व डोक्यावर टोपी असणारे कै. तुकारामशेठ शिवराम कहाणे पहिल्या मुक्कामात भेटले. भजन किर्तनात सहभाग घेऊन ते पुन्हा शाळेला दिलेल्या खोलीत येत असत. आगदी मध्यरात्री पर्यंत पुण्यतिथीची तयारी सुरू आसे. सकाळी सकाळी लवकर उठून कामाला लागत. दिवसभर ते व डेस्क व डेस्क वरील पावती पुस्तक आसे. हिशोब वेळेत व चोख ठेवत. संस्थेचे खजिनदार म्हणुन त्यांनी किमान दशकभर कामकाज केले होते. सामाजीक जाणीव असलेले ते सुजान बांधव होते.
दिनांक :- 24 जानेवारी 2016 रोजी महासैनीक भवन, करंजेनाका, सातारा येथे संपन्न झाला. मा. प्रविण हनुमंत पडगळ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जनार्दन गोपाळराव जगनाडे, अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे (तेली संस्था) संदुंबरे व सौ. प्रिया ताई महिंद्रे व श्री प्रकाश महिंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संताजी महाराजांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करून श्री. मुकेश वाईकर - सौ. वैशाली व सुनिल नामदेव दळवी कोरेगाव जनार्दन जगनाडे आदि मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून वधु-वर मेळाव्यास सुरूवात केली.
नगरच्या पारणेर तालुक्यातील आळ कुट्टी हे गाव हाम रस्त्यावरून आत आज ही प्रवासासाठी स्वत:चे वहान असेल तर ठिक नाहीतर वाट पहात जावे लागते. पण गावाला आज चांगले बाळसे आलेले. हे बाळसे खाच खळग्याचा रस्ता पार केल्या शिवाय समजत नाही ही. आजची अवस्था परंतु त्या काळी कै. शामराव धोत्रे यांनी आपली तुटपुंजी शेती पाहिली. पाऊस नाही म्हंंटले तर त्यावर फार मोठा अन्याय होत नव्हता. त्या कोरडवाहु शेतीवर धोत्रे राबत होते. मिळालेल्या धान्यावर घर चालवत होते. घराची ओढाताण संपविण्यासाठी मिळेल ते काम किंवा जमेल तो व्यवसाय करून घर उजाळू पहात होते. त्यांना दोन मुले 1) श्री. बाळासाहेब 2) श्री. सुनिल ही हाताशी आले. गावात पिठाची गिरण सुरू होती. पिठाच्या गिरणी मुळे इलेक्ट्रीक मोटार व इलेक्ट्रीकयाचा संपर्क आला.
श्री. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगरुनगर तर्फे महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ तेली धर्मशाळा, तेली आळी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे आयोजीत करण्यात आलेला होता. या क्रर्यक्रमांस महिला वर्गाची उपस्थीती लक्षणिय होती. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 3) - मोहन देशमाने
आंबेडकर विद्यापीठाचे शिल्पकार, स्त्रि मुक्तीचे शिल्पकार, ओबीसींचे शिल्पकार म्हणुन पवारांना किती ही मोठे केले. त्यांच्या बरोबर परिषदेमधील समता किती ही जवळ गेली तरी. त्यांचे मराठा पण हे कधीच झाकोळले नव्हते. आणी झाकोळले जात नाही. कारण या सर्व त्यांच्या पाऊल वाटा आहेत. मराठा बाणा ही त्यांची द्रुतगती आहे. या बाबत विचार मांडत असताना पवारांच्या मागे धावणारे त्यावेळी महामेळावे भरवत होते. त्यांना पवारा विरोधात साधा ब्र ही सहन होत नव्हता. पण जेंव्हा समाजाचे म्होरके घरात बसले तेंव्हा कुठे यांना जाग आली. जागे झालेली ही मंडळी नवा आधार स्तंभ शोधत होते. आम्ही 12 टक्के आहोत मागुन देत नसाल तर आम्ही हिसकावून घेऊ अशी गर्जना समाज पातळीवर करीत होते. आपली डरकाळी आपलेच समाज बांधव एैकून घेत आहेत याची काळजी घेऊन टाळ्या घेत होते.