Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे :- सहकार नगर प्रभागातून विद्यमान नगरसेवक श्री. आबा बागुल पुन्हा नगर सेवक पदी 5203 मतानी विजयी झाले. त्यांना 7394 मते मिळाली तर बनावट कुणबी (मराठा) यांना 6549 मते मिळाली. ओबीसी राखीव मतदार संघात सर्वच पक्षांनी विजयी होण्यासाठी बनावट ओबीसी उभे केले होते. जात दांडगे व धनदांडगे यांनी दहशद निर्माण केली होती. मोदींचा बागुल बुवा लाट उभी करून अनेक प्रभागात भले भले पाडले. परंतु जे मोजके खरे ओबीसी विजय झालेत त्यात आबा अधीक मताने विजयी झालेत. उपमहापौर म्हणून त्यांनी केलेले काम.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा पुणे विभागीय सहविचार मेळावा दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी, क्रीडा संकुल, मंचर, ता आंबेगाव, जि. पुणे येथे संपन्न झाला अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात पदनियुक्ती आणि सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमास महासचिव डॉ भूषण कर्डीले सर सपत्नीक उपस्थित होते, त्यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन करताना समाजातील एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनी बरोबरीने काम करण्याचा सल्ला दिला. नवीन आघाड्याची माहिती दिली.
आपल्या प्रास्ताविकात मारुती फल्ले सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, आणि अशा मेळाव्याची गरज पटवून दिली. राजकीय इच्छाशक्ती समाजाने जागवून आपले अस्तित्व अधोरेखित करण्याचे आवाहन केले.
पुणे - येथिल तिळवण तेली समाज कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. सकाळी विश्वस्त सुनिल राऊत यांच्या हास्ते ध्वज फडकविण्यात आला या वेळी सर्वश्री घनश्याम वाळुंजकर, संजय भग्रत, प्रकाश कर्डिले, अशोक सोनवणे, दिलीप वाव्हळ, रामदास धोत्रे, माऊली व्हावळ, संजय व्हावळ, वाघचौरे, अजय शिंदे, रमेश भोज, विजय शिंदे व संतोष उबाळे, या सह सर्वश्री अंबादास शिंदे, रत्नाकर दळवी, सुभाष काका देशमाने, संजय पवार व सर्व समाज बांधव उपस्थीत होते.
बागबहारा : स्थानीय नगर साहू समाज द्वारा आयोजित राज्य स्तरीय राजीम सम्मान समारोह आज दोपहर बाद धूमधाम वह हर्षोल्लास के साथ प्रारंभ हुआ | अतिथियों की उपस्थिति में कार्यक्रम का शुभारंभ भव्य शोभायात्रा के साथ हुआ | बाजे गाजे के साथ भक्त माता राजीम की झांकी के साथ बड़ी संख्या में महिलाएं कलश लिए शामिल हुई | शोभायात्रा साहू छात्रावास लालपुर में शाम को पहुंची | वहां देर रात तक सभी कार्यक्रम संपन्न होंगे
पैठण : प्रतिनिधी :- वाढती स्पर्धा, घटलेले उत्पादन आणि शेतकर्यांनी कापूस पिकाला दिलेल्या पसंतीमुळे पीरांपरागत सुरू असलेल्या करडई तेल घाणा उद्योग अडचणीत सापडला आहे. या उद्योगाला नवसंजीवनी मिळावी यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.