Sant Santaji Maharaj Jagnade
राहूरी - राहुरी तालुका अध्यक्ष पदाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. श्री. सोनवणे हे या पुर्वी ही म. तैलीक महासभेचे तालुका अध्यक्षपदी होते. स्पष्ट स्वच्छ भुमीका व आपल्या कार्यावर निष्ठा या बळावर ते उभे होते. त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भाग संघटित करून विविध कार्यक्रम राबविले होते.
अ. नगर - या जिल्हा स्तरावर विस वर्षा पुर्वी अ. नगर जि. तेली संघटनावर काम करित होते. या संघटनेत संस्थापक सचिव श्री. देवकर होते. संस्था उभी करण्यास त्यांनी कष्ट ही घेतले होते. श्री. संत संताजी पतसंस्थेचे ते चेअरमन ही होते. समाजाची ही संस्था अडचनीत गेली म्हणुन गप्प न रहाता संस्थेला संजीवनी दिले.
![]()
खासदार श्री. रामदास तडस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दि. 1 एप्रिल
शुभेच्छुक
सर्वश्री चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष, प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष पुणे, ज्ञानेश्वर दुर्गुडे कार्याध्यक्ष पुणे उत्तर, प्रकाश गीधे, उपाध्यक्ष पुणे उत्तर, प्रदिप कर्पे, सचिव पुणे उत्तर, भागवत लुटे उत्तर नगर, योगेश बनसोडे रहाता मोहन देशमाने, तेली गल्ली
![]()
समाज संघटन कसे असावे हे खा. तडसांनी राबवले आहे. - ज्ञानेश्वर दुर्गुडे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पुणे जिल्हा.
भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कळसू बाईचा डोंगर कपारीतून बाहेर पडलो. भाकरी किती महाग असते हे होरपळून निघाल्या नंतर समजु लागले आपण आपली भाकरी नीट मिळवली तर ती मागे राहिलेल्या साठी मिळवण्याास हातभार लावू परंतू या लढाईत कष्ट हे करीत असताना मन कुरतडत होते. कुरतडणार्या मनातला समजावून उभा राहिलो. स्वत: स्थीर होताच समाज कार्यासाठी मन ओड घेत होते.
राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले