श्री. संत संताजी पालखी सोहळ्याचे कै. साधु शेठ हे संस्थापक सदस्य. अगदी सोहळा सुरू झाला. तेंव्हा सहकार्य कमी होते. काही कुचेष्ठा ही करीत. यावर मात करीत त्यांनी सर्वा बरोबर उभे होते. आज जो सोहळ्याला भव्य दिव्य पणा आला त्यात त्यांचा त्याग महत्वाचा आहे. चास, ता. खेड, या गावातुन ते यात सहभागी होत. त्यांचे चिरंजीव श्री. विष्णूपंत सहादू घाटकर यांनी पंढरपूर येथे स्वयंपाक घराच बांधकाम करून दिले आहे.
पंढरपुर येथील जागा व वास्तु जुन्या ट्रस्टीच्या नावावर आहे. काही मयत आहेत. ट्रस्टींनी मुत्युचे दाखले जमा करून कायदेशीर बाबी पुर्ण कराव्यात. अन्यथा येथे ही वादळ उमटेल.
- तेली समाज बांधव व देणगीदार
कै. अरूण जगन्नाथ उबाळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली
शोकाकुल :- भैरवनाथ युवक मंडळ, उबाळे नगर व
उबाळे परिवार, समस्त तेली समाज वाघोली, तेली समाज पुणे, तेली समाज पुणे नगर रोड
कै. श्रीमती शांताबाई विश्वनाथ देशमाने यांना भावपुर्ण श्रद्धांजली
शोकाकुल :- श्री. प्रभाकर विश्वनाथ देशमाने, सै. पद्मा कांंतीलाल भीसे, श्रीमती मंगल बाबुराव चव्हाण, श्री. चंद्रकांत दत्तात्रय देशमाने, श्री. मोहन दत्तात्रय देशमाने, श्री. अरूण दत्तात्रय देशमाने, श्री. सुधीर दत्तात्रय देशमाने व देशमाने परिवार सायगाव, तेली समाज सातारा
लक्ष्मण महाराज हे तसे मुळचे रहीवासी नागडे गांव ता. येवला येथील होते. परंतु पुढे व्यवसायाचे निमित्ताने शिर्डीला स्थाईक झाले. त्याकाळी मोठे होलसेल किराणा दुकान होते. परंतु त्यांच्या व आमच्या अशा दोन्हीही कुटुंबामध्ये मागील काही पिढ्यांपासुन भगवद्भक्तीचा वारसा चालत आलेला आहे. माझे आजोबा ह.भ.प.श्री.चंद्रभानजी लुटे हे आळंदीला जोग महाराजांनी सुरू केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी होते. त्यांनीच लक्ष्मण महाराजांना आळंदीला जाण्याची प्रेरणा दिली व आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी ठेवले. आमच्या कुटुंबाचा पहिल्यापासुनच बेटावरील सर्व महात्मांशी सतत संपर्क राहीला.