सर्व समाज बांधवाना कळविन्यात येते की दि 24/01/16 रविवार रोजी आपण वधु-वर मेळावा आयोजित केलेला आहे.त्याच्या आयोजन सबंधी एक महत्वपूर्ण बैठक दि 18/10/15 रविवार वेळ 7:30 सायं.रोजी
श्री. संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतीथी 27/12/2016 रोजी सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे
येथे सदर पुण्यदिनी समाधी दर्शनास आपण सर्व उपस्थीत रहावे.
मा. श्री. जनार्दन जगनाडे, अध्यक्ष संत संताजी तेली संस्था सुदूंबरे
घोडेगांव - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची आंबेगाव तालुका सहविचार सभा घोडेगांव येथे संपन्न झाली. यावेळी येथिल श्री. वासुदेव शिवाजी कर्पे यांची एकमताने तालुका अध्यक्ष पदी निवड झाली या वेळी सर्वश्री चंद्रकांत शेठ व्हावळ विभागीय अध्यक्ष श्री. मारूती फल्ले पुणे उत्तर जिल्हा अध्यक्ष, श्री. प्रदिप कर्पे सचिव प्रकाश गिधे कार्याध्यक्ष पुणे उत्तर उपस्थीत होते.
येथील कुमठे फाट्यावर असलेल्या साई मंगल कार्यालयामध्ये उद्योगपती, जायगावचे सुपुत्र पोपटराव गवळी यांचा तेली समाज व ग्रामस्थांच्या वतीने शाल, पुष्पहार सन्मानपत्र दऊन पफथवीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, दादाराजे खर्डेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बाचल, माजी जि. प. सदस्य किरण बर्गे, मनोहर बर्गे, सरपंच जयश्री सपकाळ, सुभाष उर्फ नाथा कदम उपस्थित होते.
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गेली दोन वर्षा पासुन रस्त्यावर नसलेले अंदोलन कुठे तरी धुमसत होते. तेवढ्यात महाराष्ट्र शासनाने पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर केला. तो होताच त्याला प्रचंड असा विरोध सुरू झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधाच्या नाकावर टिचुन महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार जाहीर केला. इथेच विस्तवाला फुंकर मारली. पुरोगामी विचाराचे चळवळ वाले काही संघटना दाबलया गेल्यात त्यांचा आवाज दडपला गेला हा मुक्त संदेश होता. पण पुरंदरे विषयी एवढा राग का याचे उत्तर मी शोधत होतो त्याच दरम्यान प्रा. अ.ह. साळुंखे यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी अभ्यास करून ज्या बाबी पुराव्यानीशी मांडल्या. पुरंदरे यांनी शिवचरित्र्यात संधी मिळेल तेथे मराठा समाजाची अब्रू वेशीवर कशी टांगली. पुरंदरे आपल्या शब्द सामर्थावर पराक्रम मांडताना मराठ्यांना हिन कसे बनवतात हे पुराव्या निशी त्यांनी मांडले. याच वेळी ब्रामहणांचा उद्धात्तीकरण करिताना त्यांनी केलेली धडपड स्पष्ट पणे समोर येते. आशा पुरंदरेंना पुरस्कार ही चिड त्या समाजा समोर येते. परंतु तेली, माळी, नाभीक, महार, लोहार, चांभार, अशा जातीतील मंडळींचा इतिहासच पुसन टाकुन आपल्याला शिवाजीच्या पराक्रमी इतिहासातुन नामशेष केले. याचे साधे सोयर सुतक ही वाटले नाही. आपण कुणाच्या तरी कळपाचे चाकर झालो. ही वास्तवता विसरता येत नाही. म्हणुन ही मांडणी करतो.