राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले
खासदार तडस साहेबांनीच समाज संघटीत केला - संजय टेकाळे जामखेड
आमच्या नगर शहरात खा. रामदासजी तडस साहेबांना समाजाचे अध्यक्ष पद महाराष्ट्राचे मिळाले. आणि आज खर्या अर्थाने समाज जागा करून संघटीत केला ते राजकीय क्षेत्रात खासदार झाले. उद्या केंद्रीय मंत्री होतील. परंतू यासाठी त्यांचे कष्ट ही आम्हा बांधवांची शिदोरी आहे. तसा माझा त्यांचा कार्यक्रम पुरता संबंध आला परंतू समाज म्हणजे काय ? संघटन म्हणजे काय हे शिकता आले.
नाव - सौ. विमल सतिश वाव्हळ माहेरचे नाव - विमल बबन उबाळे. जन्म - 13/07/1961 मु.पो. वाडा ता. खेड (राजगुरूनगर) जि. पुणे. आमचा हा वाडा हे गाव फार खेडेगाव आहे. भिमाशंकरपासून पायथ्याशी 30 कि.मी. अंतरावर हे आहे. तसेच हे गाव भिमा नदीच्या काठावर आहे.
आमच्या घरात पंजी, आजोबा, आजी, वडील, आई तीन चुलते व पाच आत्या हे होते. नंतर तीन चुलत्या दोन भाऊ व आम्ही दोघी बहिणी व सर्व घरातील एकूण चाळीस माणसांचा हा परिवार आहे. सर्व मुंलाची लग्ने झाली, चुलतभाऊ बहिणी बारा व आत्यांची बारा जण आता सर्व मिळून नव्वद एक संख्या आहे. यातील बरीच मंडळी कालवश झालीत. नऊ भावडांत माझे वडिल मोठे होेते.
यंदाच्या सुदूंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे तेली पुण्यतिथी महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना सुभाष करडिले आहेत. त्यांचा जन्म कोतुळ ता. अकोले, जि. अहमदनगर येथे झाला त्यांचे वडील कै. दामोधर जयराम काळे हे नगर जिल्ह्यातील धाडसी आणि कर्तबगार व्यापारी होते. तसेच ते नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते होते. सौ. सुलोचना करडिले यांचा विवाह पुण्यातील श्री. सुभाष शंकरराव करडीले यांचेशी 1976 रोजी झाला.
अहमदाबाद में समस्त घाणीवाल तेली समाज द्वारा समाज की प्रतिभाओं को सम्मानित किया तेली समाज के नवयुवक संघठन के अध्यक्ष ईश्वर लाल मंगरोला ने बताया कि यह कार्यक्रम समाज के बच्चों के लिए किया गया इसमे रियायती दर पर चोपड़े (नोट बुक) वितरण किये और समाज की प्रतिभाओं को ट्रॉफी ओर प्रंशसा पत्र से सम्मानित किया गया सर्व शिक्षा अभियान के कार्यक्रम में मुख्य अतिथि अहमदाबाद के महापौर गौतम शाह और म्युनिसिपल कॉरपोरेटर फाल्गुनी बेन शाह थे।