Sant Santaji Maharaj Jagnade
संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व तेली समाजातील मार्गदर्शक सोमनाथ बनसोडे (रा. दाढ बु.) यांची पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तेली समाजाचे तिर्थ श्रीक्षेत्र संत संताजी महाराज देवस्थान समितीच्या कार्यकारिणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
लोणी ता. राहाता येथे संताजी बचत गटाची स्थापना झाली अनेक समाजबांधव उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली अनेकांनी आपले विचार मांडले यावेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सोमनाथराव बनसोडे सर यांनी बचत गटाची आवश्यकता का आहे यावर मार्गदर्शन केले.
नेवासा तेली समाज - धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तैलिक समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. अत्याचार करणार्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील होंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणाच्या शिक्षकास कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी नगर शहरात सोमवार दि. २६ रोजी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक हरिभाऊ डोळसे यांनी दिली.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या ५ वर्षाच्या अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. तरी या अमाणवीय कृत्याचा सर्व तेली समाजबांधवांच्या वतीने जाहीर निषेध.