हिवरे येथिल श्रीराम ग्रामीण पतसंस्थेच्या उभारणीत सहभाग स्थापने पासुन ते संचालक आहेत. गत दहा वर्ष ते पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ही आहेत. अहमदनगर जिल्ह्या जे माथाडी बोर्ड आहे. त्या बोर्डच्या कमिटीवर ही सदस्य म्हणुन काम करीत आहेत. श्री. सदाशिव साळुंखे यांचा नेवासा मार्केट कमीटी उभी करण्यात संचालक म्हणून फार मोठा सहभाग. या मार्केट कमिटीवर श्री. देवीदास साळुंखे संचालक म्हणुन काम करित होते. या कार्य काळात ते मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन म्हणुन होते, शेतकरी व्यवसायीक यांच्या व्यवहारा बरोबरच मार्केट कमिटीचा विकास यातील बारकावे वापरल्या मुळे सुसंवाद साधणारे संचालक ही त्यांची प्रतिमा होती. म्हणुन गतवर्षी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्याची नियुक्ती मार्केट कमिटीवर तज्ञ संचालक म्हणुन केलेली आहे.
जीवनाच्या प्रवासत स्थिरता आली मामांच्या मुळे सुदुंबरे व संत संताजी माहित होते. त्यामुळे पुण्यतिथी दिवशी ते सुदुंबरे येथे येत. यातुन ओळखी वाढु लागल्या यातुनच समाज समजुन घेता आला व ते महाराष्ट्र तेली महासभेच्या संपर्कात आले. यामुळे ते मावळ तालुका अध्यक्ष झाले. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभा त्यांनी यशस्वी पने राबविले. खाने सुमारी करण्यासाठी सोबत्यांना घेऊन तालुका पिंजुन काढला. यातुन समाज संघटन घडले. खाने सुमारी पुस्तक प्रकाशनासाठी जिल्हा कमिटी बरोबर मेहनत घेतली. त्याचे रूपांतर समाजाच्या मेळाव्यात आहे येथे दिसुन आले. पिंपरी चिंचवड येथिल संत संताजी सेवा प्रतिष्ठाण या संस्थेत काम करत आले. सन 2014 च्या वधुवर मेळाव्याचे स्वागतअध्यक्ष पद ही त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. धडपड, त्याग, निष्ठा व प्रामाणिक पणा या जोडीला सौ. निता यांची साथ सोबत यशो मंदिराकडे घेऊन गेली हे ते अभिमानाने सांगतात.
प्रत्येक माणसाशी आत्मीयतेने वागण्याच्या स्वभावामुळे भागवत समाजप्रिय आहेत. सुकरी येथे त्यांनी समाजविधायक कार्याला वाहुन घेतले आहे. आज ते नगर जिल्हा उत्तर तेली समाजाचे अध्यक्ष असुन. गणेश सहकारी पतसंसथा व्हाईस चेअरमन पदावर आहेत. साकुरी गावात सलग 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. साकुरी गावात समाज बांधवांच्या सहकार्याने संताजी महाराजांचे मंदिर उभारले. तेथे दरवर्षी संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते. याशिवाय त्यांनी संताजी दिनदर्शिका प्रसिद्ध केली. वधू-वर मेळाव्यात सहभाग घेऊन अनेक वधु-वरांचे लग्न जमविले. महिलांसाठी हळदी - कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून समाज संघटनेच्या प्रक्रियेत महिला शक्तीला आणण्याचा प्रयत्न केला.
घरात बाजरीची भाकरी व खर्डा मी जेवलो तसा आज ही या सुखी कुटूंबाचा नेहमी अग्रह मोडता येत नाही. श्री. दत्तोबा यांनी ओळख पाळख नसताना एक समाज बांधव ही साथ दिली. आज ही ते दरवर्षी सुदूंबरे येथे येत असतात. त्या अफाट समाजात त्यांना संताजी भेटतात. तेली समाजाच्या संघटनेत सहभागी होतात. माझा समाजही जाणीव त्यांच्या अंतकरणात कायमची कोरली आहे. समाजातील सर्वात जर हे कोरीव काम झाले तर प्रगती लगेच होईल.
श्री. भागवत कचरूशेठ लुटे, मु. साकुरी, ता. रहाता, जि. अ. नगर, यांचा रविवार दि. 28/6/2016 रोजी वाढदिवस समारंभ संपन्न झाला. श्री. लुटे यांनी विविध पदांवर आजवर कार्य केले आहे. त्याचा अत्पसा परिचय.