चाकणचा सुपुत्र महाराष्ट्राचा अभिमान. मराठी माणसाची धनदौलत साठवणारा, तुकोबाचा शिष्य संताजी जगनाडे आपल्या पंढरीस जात आहे. जाता जाता आपल्या जन्मभूमीला भेटत आहे. ही भेट अविस्मरणीय ठरावी हा लोकमानस चाकणकर मंडळी टाळमृदंग घेऊन चाकणबाहेर आली. आली आली म्हणेपर्यंत संताजींची पालखी चाकणच्या शिवेवर आली. चाकणकरांचा आनंद शब्दांत मावत नव्हता. हर एकाने या भूमीच्या सुपुत्रांचे दर्शन घेतले मग संताजीचा गजर टाळ-मृदंगात करीत देहभान हरपून नाचत बागडत गावात निघाली
पालखी विषयी दोघांनी जो वेगवेगळ्या मार्गाने विचार केला तो त्यांनी एकमेकाला सांगितला. विचारांची देवणाघेवाण झाली. एकमेकातल्या उणिवा दूर झाल्या राऊतांची पूर्ण खात्री झाली. हा माणूस नुसता बोलघेवडा नाही. आपल्या प्रमाणे अभ्यास केलेला आहे. हाच माणूस खात्रीशीर सहकार्य करेल. पालखी तुकोबाच्या मागे नेली तर येणार्या अडचणी ह्या माऊलीच्या मागे जाण्यापेक्षा जास्त आहेत. तेव्हा माऊलीबरोबर जाण्यातच हित आहे. पण तरी चौकटीआतील बोलणी. उद्या माघार नको. एकमेक कुठे तरी बांधले पाहिजे.
संताजी ब्रिगेड कार्यकारीणी
श्री. रमेश स. भोज, संस्थापक अध्यक्ष | श्री. विजय रत्नपारखी, जिल्हा कार्याध्यक्ष | सौ. राधिका मखामलेे, जिल्हा महिला अध्यक्षा |
श्री. दिलीप शिंदे, जिल्हा सचिव | श्री. प्रीतम केदारी, जिल्हा उपाध्यक्ष | श्री. गणेश चव्हाण, जिल्हा सहसचिव |
श्री. सुर्यकांत बारमुख, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख | श्री. संतोष व्हावळ, पुणे शहर अध्यक्ष | श्री. संदीप चिलेकर, पिं. चिं. शहर अध्यक्ष |
श्री. महेश अंबिके, शहर उपाध्यक्ष | श्री. अनिल उबाळे, शहर उपाध्यक्ष | श्री. सचिन काळे, पिं. - चिं., युवा अध्यक्ष |
( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
सर्व संतात तुकोबांना आपण कळस चढविला म्हणतो. तुकोबांचे अभंग माहीत नाहीत किंवा ऐकले नाहीत असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. ही महाराष्ट्राची अनमोल ठेव आहे. या ठेवीवरच येथील समाज जीवन उभे आहे. ही ठेव प्राणपणास लावून जपणारे महान पुरूष म्हणून आपण संताजी महाराजांना ओळखतो इतिहास आपल्या पानावर हेच नमुद करत आहे. परंतु काही काळ असा होता की, सुदुंबरे या गावात एक पडकी समाधी हीच फक्त आठवण होती.
पुणे :- ज्येष्ठ साहित्यिक अँड. सहदेव मखामले यांना महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीषभाऊ महाजन यांचे हस्ते अखिल-भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचा २०१४/१५ चा सानेगुरूजी साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.