श्री. संताजी प्रतिष्ठाण, नगररोडची स्थापना होऊन पहिली मिटींग दि. १/०३/२०१५ रोजी चंदननगर पुणे. येथे पार पडली. मिटींगमध्ये खालील कार्यकारीणीची सर्वानमुते निवड झाली.
साई बाबा यांच्या पाद स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी नगरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच "डॉ. मेघनाद साहा" यांची पुण्यतीथी अ. नगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी साजरी करण्यात आली .
डॉ सुधाकर चौधरी यांनी डॉ मेघनाथ साहा यांचे जीवनावर एक तास व्याखान दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थितीत तालुका व जिल्हा पदाधिकार्यांना डॉ मेघनाद साहा यांचा फोटो व माहिती पुस्तिका त्याच्या मार्फत वाटले व पुढच्या वर्षापासून डॉ मेघनाथ साहा यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचे सर्व पदाधिकार्यांना आवाहन केले.
जिल्ह्यातील सहा तालुके आणि मुळशी तालुक्यातील कासारसई गांवातील समाजबांधव कार्यकर्ते यांचे सहकार्याने कुटुंब परिचय पुस्तिका तयार झालेली आहे.समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजबांधवांचे ऋण व्यक्त करुन यापुढेही समाजसेवेसाठीशनीमहाराजांची व संताजी महाराजांची क्रुपा लाभावी असे विचार मा. श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ पुणे जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविकातुन मांडले.
साकुरी :- तालुका राहाता जि. अहमदनगर येथे श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त साकुरी येथे तेली समाज बांधवातर्फे सामुदायीक अभिषेक करण्यात आला. महापुजा करून गावातून सजवलेल्या रथातुन संताजी महाराजांच्या प्रतिमेची ढोलताश्यांच्या गजरात पुढे भजनी मंडळ सर्व भगिनींनी, मुलींनी भजन म्हणत, फुगड्या खेळत भक्तीमय वातावरणात आनंद लुटला यावेळी गावात पालखी रस्त्यात सर्वत्र रांगळ्या घालण्यात आल्या होत्या. व ठिकठिकाणी समाज बांधव श्री. संपतराव लुटे व श्री. कैलास लुटे या समाज बांधवांनी सामुदायीक आरती केली. व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.