Sant Santaji Maharaj Jagnade
माझी बातमी माझा फोटो एवढेच वाचन करणारे आता बांधव वाचन करू लागले. आपली मते बनवु लागली. ही परिवर्तनाची वाट निर्माण झाली. कारण तेली गल्ली मासिक मिळताच त्यातील लेख वाचन करून आपली परखड मते शेकडो. बांधव देतात. ही आता जमेची बाजु समाजात निर्माण झाली त्या बद्दल सुज्ञ बांधवांचे आभार. तेली समाज सेवक मासिकात युवकांचे चिंतन शिंबीर व संपादकीय लेखात श्री. भगवान बागुल यानी बर्याच गोेष्टी मांडल्या आणि त्या मांडताच मासिकाचे संचालक मंडळ चुळबुळ करू लागले. त्यातील हायकमांडला प्रश्न पडला तेली गल्ली मासिकात जे येते ते ठिक पण आपल्याच मासिकात त्या पद्धतिने येणे ठिक नाही. परंतु याच वेळी बागुलांना बर्याच बांधवांनी अभिनंदन पर मते कळवली. याचा अर्थ एकच हाय कमांडला समाजाच्या खर्या समस्या घेऊन संघर्ष करावा लागेल. ही वास्तवता समोर आली. श्री. बागुल सरांनी आपल्या लेखात एक शब्द प्रयोग वापरला प्रथम त्यांचे अभिनंदन करतो. तो शब्द प्रयोग आसा पुरे झाले वांझोटे कार्यक्रम. परत आपन या सर्वांचा समाचार घेऊ. आपल्या वेदनांचा मागोवा घेऊन तेली बलवान करू.
पारतंत्र्य म्हणजे गुलामगीरी ही सामाजीक, आर्थीक, सांस्कृतीक व राजकीय असु शकते. गुलामाला गुलामगीरीची जाणीव झाली की तो काय करू शकतो याचे जीवंत उदाहरण म्हणजे अस्तगांव, जि. नगर येथील स्वा. सैनिक तुकाराम हरिभाऊ गाडेकर हे होत. त्यांचे अप्रकशित आत्मपरिक्षण हस्तलिखीत स्वरूपात मिळाले ते त्यांचे चिरंजीव काशिनाथ तुकाराम गाडेकर यांनी मला प्रकाशित करण्यास परवानगी दिली.
![]()
श्री. पोपटराव पालखी बरोबर पंढरीला जात. या वेळी अडानी पण खर्या सुशिक्षीत असलेल्या आईला एक गोष्ट पटत नव्हती. माझा संताजी ज्या पालखीतून मिरवत जातो. ती इतर संतांच्या पालखी सारखी दर्जेदर नाही. ही उनिव मुला समोर मांडली श्री. पोपटरावानी यावर स्वत: विचार केला. आणि संताजी साठी पालखी स्वखर्चाने बनवुन देतो असे सांगितले. रोख पैसे न देता अंदाजे एक लाख रूपयांची पालखी स्वत: बनवुन दिली. आईची इच्छा पूर्ण केली.
मग सर्व एकत्र आले. पालखी सुरूवात करणे जेवढे कष्टाचे होते तेवढेच, नव्हे जास्तच, त्याचे सातत्य टिकविणे अवघड होते. या अवघडपणावर चर्चा झाली. कार्यातले दोष झिडकारून सोहळा निर्दोष करण्यावर विचारविनिमय झाला. प्रत्येक वर्षी पालखीला भरीव स्वरूप येऊ लागले. तेव्हा पालखीसोहळ्याची पहिली कार्यकारीणी तयार केली.
![]()
पालखी वाल्ह्याच्या मार्गाला लागली. वाल्हे या ठिकाणचे पवार व इतर समाजबांधव स्वागताला गावाबाहेर उभेच होते. स्वागत व पूजन केले. संध्याकाळी दमलेल्या बांधवांना जेवण दिले. सकाळी गरम पाणी आंघोळीला दिले. चहापाणी झाल्यावर विश्वनाथ सोपान, विष्णु, सुरेश यांनी पालखी शिवराम पवार यांच्या घरी आणली दत्तात्रय तुकाराम पवार इ. मंडळींनी पालखी गाव वेशीपर्यंत नेली या मुक्कामात पुन्हा चार वारकरी आमच्यात आले.