Sant Santaji Maharaj Jagnade पुणे :- ज्येष्ठ साहित्यिक अँड. सहदेव मखामले यांना महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीषभाऊ महाजन यांचे हस्ते अखिल-भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचा २०१४/१५ चा सानेगुरूजी साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा विशेष अंक
82 भवानी पेठ पुणे (तिळवण तेली समाज कार्यालय) येथे. श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळात श्री. मोहन देशमाने लिखीत श्री. संत संताजी महाराज जगनाडे संपुर्ण इतिहासाचे पुस्तकाचे प्रकाशन पालखी सोहळ्यात करण्यात आले.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (2)
विदर्भ तेली संघर्ष समितीचे प्रमुख मधुकर वाघमारे यांनी ४ पानी पत्रक तेली समाजाच्या राजकीय मंडळींना दिले. तसेच प्रसिद्धीस ही दिले. पण समाजाच्या खासदार, आमदार व राजकीय क्षेत्रातील मंडळींना साधी या पत्राची दखल ही घ्यावी वाटली नाही. तेली समाजाचे नाव पाहिजे. तेली समाजाची मते पाहिजेत. पण समाजाच्या हिताचा विचार येताच आपली सोय पाहिली जाते. परवा बिड मधील बातमी वार्या सारखी पसरली काही हौश्यांनी समाज पातळीवर आपल्या समाज निष्ठेचे प्रदर्शन ही भरवले.
थोड्याच काळात ते संताजी मय झाले घरी आल्यावर, तुकोबांची गाथा ज्ञानेश्वरी सुनाकडून वाचुन घेऊ लागले. हरीपाठ वाचून घेता घेता पाठ करू या ही पेक्षा ते संताजी मय झाले. यातूनच एक विचार जोपासला ते रहात असलेला परिसर पुण्या लगत परंतू तसा माळरानाचा. आपली भरपूर जागा व शेती. या परिसरात संताजी मंदिर बांधवयाचे व परिसराला संताजी नगर नाव द्यावयाचे. हा विचार घरात सांगीतला सांगताना हे ही सांगीतले मी कष्ट करेल त्या कष्टातून मंदिर उभे करेल.
![]()
पुणे :- संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचा विशेष अंक प्रसिद्ध करीत आहे. म्हणताच काही जागृत बांधवांनी प्रत्यक्ष भेटून काही बाबी स्पष्ट केल्या. सन १९८५ मध्ये नोंदणी करताना जे ट्रस्टी नमूद केले तेच ट्रस्टी आज ही धर्मादय आयुक्त कार्यालयातील नोंदीत कायम आहेत. आज तीस वर्ष या घटनेला झालेत. वयोमाना नुसार बरेच ट्रस्टी मृत्यू पावले यातील ४ ते ५ ट्रस्टी आहेत.