परंतू 96 वाले म्हणताच बिळात उंदरा सारखे लपण्यात समाधान माणनारे मला 96 वाले हा शब्द त्यांनीच दिला. साडेतीन टक्के हा आकडा घातक तसा हा 96 सुद्धा हे ते खाजगीत सांगतात वरिल किंवा आशा प्रकारे मते हजारो जन दबकत दबकत मांडतात. ही एक जगण्याची भीती ते व्यक्त करतात. आशा लाखो बांधवाना जागे करणे ही माझी आयुष्याची वाटचाल.
घरात गरिबी आली तीने घराला कवटाळलेले अगदी संस्कारक्षम वयातच ही अवस्था झालेली. वडील सकाळी घरा बाहेर पडत हाळी देत फेरीवाल्यांची काम करीत या कामातुन चार पैसे जमा त्यावर घर चालत आसे. या वेळी मामा नादेवराव सोनवणे यांनी पहिले आपला भाचा नितीन यास संभाळले. शिक्षण ही देऊ केले. शिक्षण तरी किती फकत 11 वी या उमेदीच्या वयात वाईकरांना घरची अवस्था पहावेना त्यांनी विचार केला पुढील शिक्षणा पेक्षा नोकरी बरी. गावात चौकशी करून त्यांनी सेल्सनची नोकरी स्विकारली दुकानात येणारे गिर्हाईक हे गिर्हाईक असते त्याचा विश्वास संपादन करणे आपल्या मालाची वैशिष्टे स्पष्ट करून त्याला परवडेल व आनंदी होईल या पद्धतीने माल खपवने.
शिक्षण आहे, नोकरी नाही, खिशात पैसा नाही म्हणुन व्यवसाय नाही म्हणुन पैसा नाही हे रडगाणे गात बसण्यापेक्षा आपण यावर ही यश कमवु शकतो हे राहुरी जि. नगर येथील श्री. संजय विठ्ठल पन्हाळे यांनी सिद्ध केले आहे. वडिल विठ्ठल पन्हाळे हे संगमनेर येथे उमेदीच्या काळात ओल्या, भाजक्या शेंगाची गाडी लावत होते. ही गाडी लावता लावता भाजीपाला विक्री करू लागले. यातुनच गावकामगार तलाठ्याची नोकरी लागली.
समाजाच्या नेत्यांची एक पद्धत ठरली आहे. ज्याच्याकडे चार चाकी गाडी आहे. ज्याची गावात शहरात प्रतिष्ठा आहे. ज्याच्याकडे चार प्रतिष्ठीत नातलंगांची साठवण आहे. ज्याला या सोबत वेळ आहे. असा समाज बांधव समाज संस्थेचा अध्यक्ष असु शकतो असा साठवण असलेला बांधव समाज संघटनेत मानासाठी निवडला जातो. या सर्व प्रक्रिया निदान राहुरी शहरात बगल देऊन ज्याच्या जवळ समाज निष्ठा आहे. आशा बांधवालाच तेली महासभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. यांची सार्थ निवड ही त्यांनी बर्याच बाबत सार्थक लावली हे श्री. दत्तात्रय नरसिंह सोनवणे यांनी सिद्ध केले आहे.
महाराष्ट्राची कुलदैवत भवानी माता दसर्या दिवशी ही भवानी माता पालखीत बसते. ती तुळजापुरात सिमाउल्लंघन करते ती पालखी राहुरीत तयार झालेली इतिहासाच्या पानावरून ती शेकडो वर्ष वाटचाल सुरू आहे. या एैतिहासिक कामात भाऊ सर्वा बरोबर नव्हे तर पुढे असतात हा समाज ठेवा जतन करून समाजाला सोबत ठेवतात. अहमदनगर जिल्हा तेली समाज संघटन होण्यास ते होते. नगर येथे प्रथम जे सामुदाइक विवाह सोहळा व मेळावे झाले. त्यात ते सक्रिय होते.