Sant Santaji Maharaj Jagnade
घरात बाजरीची भाकरी व खर्डा मी जेवलो तसा आज ही या सुखी कुटूंबाचा नेहमी अग्रह मोडता येत नाही. श्री. दत्तोबा यांनी ओळख पाळख नसताना एक समाज बांधव ही साथ दिली. आज ही ते दरवर्षी सुदूंबरे येथे येत असतात. त्या अफाट समाजात त्यांना संताजी भेटतात. तेली समाजाच्या संघटनेत सहभागी होतात. माझा समाजही जाणीव त्यांच्या अंतकरणात कायमची कोरली आहे. समाजातील सर्वात जर हे कोरीव काम झाले तर प्रगती लगेच होईल.
श्री. भागवत कचरूशेठ लुटे, मु. साकुरी, ता. रहाता, जि. अ. नगर, यांचा रविवार दि. 28/6/2016 रोजी वाढदिवस समारंभ संपन्न झाला. श्री. लुटे यांनी विविध पदांवर आजवर कार्य केले आहे. त्याचा अत्पसा परिचय.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 5)
आज रजिस्टर केलेली तेली समाजाची संस्था या पुर्वी रजीस्टर केली होती. तिचे संघटनेने सभासद, अजिव सभासद बनविलले होते. असे अनेक बांधव स्पष्ट सांगतात. पुन्हा ही संस्था वेगळ्या नावाने रजिष्टर केली गेली. या प्रक्रियेत पहिल्या संस्थेच्या मंडळींनी निबंधाकडे हिशोब सादर केले नसतील त्यामुळे प्रश्न उभे राहिले असतील. हे ही मान्य करु परंतु संस्था नोंदणी करण्याची प्रक्रिया बरेच दिवस सुर होती. त्या बाबत काही मिटींगा ही झाल्या. परंतु संघटनेच्या पदाधिकार्या समोर त्याचे म्हणजे घटनेचे वाचन झाले का ? जर झाले असेल तर ते वादळ विनाकारण आहे. आणी फक्त काही विश्वासु मंडळींना दाखवुन नोंदी केली असेल तर वादळ योगयच म्हणावे लागेल. या ठिकाणी एक मुद्दा पुन्हा मांडतो भारताची राज्यघटना म्हणजे संविधान जर प्रत्येकाने घेऊन वाचन केले तर देश जगात एक नंबरचा होईल.
सौ. कविता यशवंत भागवत ग्रा. पं. सदस्या.
बदतापुर - अकोले तालुक्यातील बेलापुर (बादगी) या येथिल ग्रामपंचायत सदस्य पदी नुकतीच निवड झाली आहे. बेलापुर समाजबांधवा तर्फे त्यांचे अभिनंदन.
प्रकाश गिधे, म. तेली महासभा, खेड तालुका
विशेषत: सह्याद्रिच्या दर्या, खोर्यात, उजाड माळावर वसलेल्या गावात तेली समाज मुठभर वस्ती. या वस्तीतला तेली पाटला समोर हात बांधुन उभा. गावचा सरपंच दोन शब्द बोलतो ही सुद्धा वार्याची झुळूक आहे. असा अनुभवणारा समाज. आमदार किंवा खासदारांना मते देयची आसतात. त्यांची साधी भेट ही घेता येत नाही. राखीव जागेवरील पद बोगस मराठा कुणब्यांनी पळवले आहे. आशा खचलेल्या, पिचलेल्या, कोंडीत पकडलेल्या तेली बांधवांना खासदार तडस साहेबांच्या रूपाने एक संजीवनी मिळाली आहे. कारण आहेरे समजल्या जणार्या जातीतच आमदार, खासदार असतात ही आमची रोजच्या जगण्यातील वास्तवता त्यांनी संपवली आहे. लोकसंख्येने 12 टक्के असलेला हा समाज ही सत्तेचा शिल्पकार होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.