Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड हि मान्यताप्राप्त संस्था असुन संस्थेची सभासद संख्या दोन हजार पर्यंत आहे. संस्था दरवर्षी 26 जानेवारी ह्या दिवशीच हा कार्यक्रम आजपर्यंत घेत आलेली आहे. आणि या कार्यक्रमाची पुर्ण कल्पना पुणे परिसरातील सर्व समाज बंधु भगिनींना असल्यामुळे सर्वजन कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचे पत्रक वगैरे न काढता फक्त कार्यक्रमाचे स्थळ वेळ मॅसेज द्वारे पाठवीले जाते.
उमेदीच्या काळात नगर शहरात आपला ठसा उमटवल्या नंतर ते व श्री. गोकूळ काळे हे श्री क्षेत्र सुदूंबरे संस्थेत पदाधीकारी म्हणून कार्यरथ झाले. संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ कामकाज पाहिले. याच दरम्यान कै. केशरकाकु क्षिरसागर यांचा संबंध आला. महाराष्ट्रात प्रथम नगर शहरात त्या खासदार होताच जंगी सत्कार केला. केशरकाकु महाराष्ट्र तेली महासभेच्या अध्यक्षा होत्या. विदर्भात रूजलेली ही संघटना मराठवाड्यात नावा पुरती होती. पण हीच संघटना उरलेल्या महाराष्ट्रात नावा पुरती ही नव्हती. अहमदनगर शहरात देशपातळीवरील मिटींग 1994 च्या दरम्यान आयोजित करण्यात कै. प्रकाशशेठ यांनी पुढाकार घेतला. याच जाहिर मिटींग मध्ये काकु देशपातळीवर अध्यक्षा झाल्या.
महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासाचा ठेका घेतलेली संघटना व या संघटनेचे हाय कमांड ते पदाधिकारी एका तालात एका सुरात नेहमी एकच गाणे वाजवतात. आम्ही बारा टक्के आहोत. आम्ही तुमचे बारा वाजवु शकतो. या गाण्यातील हे जे कडवे आहे. ते मात्र सत्य आहे. कारण या कडव्यात खरी ताकद आहे. पण जसे हे गाणे लांबत जाते तसे समाजाचा शेवटचा बांधव त्याच गाळात अधीक रुतु लागतो. तेंव्हा उरते फक्त कडवे आणी याचा गाभा हवेत विरला जातो.
नेवासा - येथिल अडत व्यापारी श्री. देवीदास सदाशीव साळुंखे यांची भानस हिवरेया ग्रा. पं. मध्ये नुकतीच निवड झाली आहे. नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर संचालक म्हणुन आमदारांनी शिफारस केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड मार्केट कमिटीवर केली आहे. या पुर्वी या मार्केट कमीटीच व्हाईस चेअरमन ही होते. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
चाकण :- समाज संघटन करून नेतृत्व साकारलेल्या सौ. निता करपे यांची निवड श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नुकतीच त्यांची निवड झाली.