santaji teli samaj mandal panvel Ayojit teli samaj vadhu var melava form 2016
रविवार दिनांक - 21/02/2016
वेळ- सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत
मेळावा स्थळ - आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, सरस्वती शाळे समोर, पनवेल - रायगड
सातारा शहराजवळ अरफळ नावाचे गाव आहे. या ठिकाणी काळोजी महाराजांनी समाधी घेतली आहे. अनेक दशके या ठिकाणी छोट्या प्रमाणात समाधी दिन साजरा होत होता. परंतु सातारा जिल्हा समस्त तेली समाज या संस्थेने त्यात लक्ष दिले आणि दर वर्षी जिल्हा स्तरावर समाधी सोहळा संपन्न होत आसते. या साठी संस्थेचे पदाधीकारी व मार्गदर्शक श्री जयसिंगराव दळवी लक्ष देतात. आरफळ जवळ जरंडेश्वर डोंगरावर हनुमानाचे मंदिर आहे.
समाजाचे एक जेष्ठ विचारवंत व विदर्भ तेली समाज संघर्ष समितीचे प्रमुख श्री. मधुकर वाघमारे मला नागपुर भेटीत म्हणाले होते. संत संताजीचे संदर्भ फार कमी ठेवलेत फार मोठी अडचन मांडणी करताना होते. आणी मी ते अव्हान स्विकारले तेंव्हा त्या बाबत वाचन व चिंतन करू लागलो. तेंव्हा संत संताजी विषयी शोध घेतला बरेच रस्ते सापडले. त्या रस्त्यावर एक महान पुरूष समोर आला. तेल्याने मावळत बाजुला रहावे. त्याच्या घाण्याचा आवाज ही येऊ नये. तेल्याने मंदरातील देवाला तेल द्यावे त्या तेलाने स्वत: जळुन देवाचा अंधार नष्ट करावा.
होता संतु म्हणुन वाचला तुका, तुकोबांच्या चौदा टाळकर्या पैकी एक टाळकरी संत संताजी संत तुकोबा गाथा पालन कर्ते म्हणजे संत संताजी. मी सुद्धा वरिल समजत होतो. पण संत संताजी सर्व दिशांनी जेंव्हा समजुन घेऊ लागलो तेंव्हा मला संत संताजी वरिल पद्धतीने मांडणे हेच मुळात त्यांच्यावर फार मोठा अन्याय करण्या सारखे आहे. हे माझेच मला समजुन आले. संत संताजी पुर्ण समजले नाहीत पण जे समजले संभाळले व वाटले सुद्धा. त्या शब्दांच्या शस्त्राने पुढे शेकडो वर्ष माणसाला जगता येऊ लागले. पण ही संत संताजींनी संभाळलेली शस्त्रे आज आपणच त्यांना दुर लोटत आहोत. तेंव्हा पुन्हा एक वेळ संत संताजी समजुन घेऊ.
कै. भाऊंनी समाजातील काही गरीब विद्यार्थीना दत्तक घेऊन मदत केली. संस्थेची शिक्षण समीती सशक्त असेल तर मदत ही चांगली देता येते. हे विचार मांडून भाऊ थांबले नाहीत तर त्यांनी समिती प्रमुखा बरोबर महाराष्ट्रभर दौरे ही काढले. त्युळे बरीच वर्ष भविष्यात शिक्षण समीती गरिब विद्यार्थाना शैक्षणिक मदत देत होती. समाज म्हणजे भाऊ व भाऊ म्हणजे समाज असे समिकरण होते. वाई येथे समाजाची तेल उत्पादक सोसायटी ही सुरू केली होती. त्यामुळे तेल उत्पादन करणार्या बांधवांना मदतीचा हात देता आला समाजातील अनेक बांधवांना त्यांनी मार्गदर्शनाचा व सहकार्याचा हात दिला आहे त्यामुळे बरेच जन आपल्या आयुष्यात खंबीर उभे आहेत. तेली गल्ली (गावकूस) 1983 मध्ये सुरू करताना कै. भाऊंनी समाज समजुन दिला वाटचालीचे मार्गदर्शन ही केले.