Sant Santaji Maharaj Jagnade
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणांपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. आजचा विद्यार्थी कोणतेही शिक्षण घेत असला, तर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठा अधिकारी झाला, तर त्याचा गौरव करण्यात मला आनंद होईल. विद्यार्थी शिक्षणासोबतच राजकीय व सामाजिक घडामोडींचे ज्ञान ठेवून त्यातही करिअर करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले.
अकोला येथे तेली समाज युवक संघ च्या वतीने स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते सर्व नगरसेवक शशिभाऊ चोपडे नितीनभाऊ झापर्डे तुषारभाऊ भिरड सौ किरण ताई बोराखडे अभय भाऊ बिजवे सर्व तेली समाज युवक संघाचे कार्यकर्ते व समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. तेली समाजातील नवयुवकांंनी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.
दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी अमरावती तेली समाजा तर्फे शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातत प्राविण्यप्राप्त केलेल्या व स्पर्धा परिक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा अमरावी जिल्हा तैलिक समिती च्या वतीने रविवार दि. 29 जुलै 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता टाऊन हॉल, नेहरू मैदान, राजकमल चौक, अमरावती येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
उस्मानाबाद दि. 23-03-2018 उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची २४ रोजी शासकीय विश्रामगृह येथे दुपारी २ वाजता जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके जिल्हा सचिव अॅड. विशाल साखरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम तसेच समाज मेळावा आ. जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित संपन्न झाला. यावेळी तैलिक साहू सभेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हासचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले ,लोहारा तालुकाअध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उमरगा तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी,