Sant Santaji Maharaj Jagnade
बीडच्या माजी खासदार केशरकाकु सोनाजीराव क्षीरसागर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त जय संताजी युवा मंच, तेली समाज औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नगरसेवक भाऊसाहेब जगताप होते. राधाकिसन सिदलंबे, विश्वनाथ गवळी, कृष्णा ठोंबरे, साई शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ सुरडकर यांनी केले.
दि:०७/१०/२०१८ रोजी तेली समाज धाराशिव सचिव व मा. नगरसेवक अँड विशाल साखरे व रॉबिनहूड आर्मी उस्मानाबाद मार्फत मधूबन कुष्ठधाम उस्मानाबाद येथे सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा आदरणीय श्री डॉ. दिग्गज दापके-देशमुख सर,डॉ.सतीश गवाड सर आणि दादासाहेब कोरके सरांच्या सहकार्याने आणि पोलीस उपनिरीक्षक श्री सोहन धोत्रे सरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ यांची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी दि २२ रोजी शासकिय विश्राम गृह येथे दुपारी १ वाजता उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा,येडशी,कोंड,वाघोली,तेर,घुगी,आळणी,पाडोळी,जागजी,दारफळ,पळसप,देवळाली,आदि गावातील तेली समाज बांधवाच्या उपस्थितीत तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली
उमरगा-लोहारा : उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या तेली समाजातील गुणवंतांचा गुंजोटी येथे समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ टोंपे तर प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, शिवानंद कलशेट्टी, शिवानंद साखरे, शिवकुमार दळवी, विजयकुमार कलशेट्टी, काशिनाथ निर्मळे, प्रा. डॉ. सुर्यकांत रेवते, सतीश कोरे, संघटनेचे अध्यक्ष मोहन टोंपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज युवक आघाडी पूर्व नागपुर कार्यकारिणी घोषित करतानी प्रमुंख अतिथि उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मानणीय विजयजी हटवार समाज सेवक मानणीय अभिजीतजी वंजारी समाज सेवक अकुश येलणे.विभागीय उपाध्यक्ष शैलैशजी शाहु आदणीय शंकरजी वंजारी नागपुर शहर युवक आघाडी अध्यक्ष अजयजी धोपटे नागपुर शहर युवक आघाडी महासचिव रुपेशजी तेलमासरे.समाज सेवक नगरसेवक दिपकजी वाडीभस्मे