Sant Santaji Maharaj Jagnade
तेली (तैलिक) समाजाचा वर-वधु परिचय मेळावा अमरावती जिल्हा तेली (तैलिक) समितीच्यीवतीने १६ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवनात उप वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती पत्रपरिषदेतून समिती अध्यक्ष संजय आसोले, मिलींद शिरभाते, गंगाधर आसोले, सुनिल जयसिंगपुरे, प्रकाश बनारसे, रमेशपंत शिरभाते, चंद्रशेखर पिपळे, चारुदत्त गुल्हाने, संजय रायकर, निलेश शिरभाते, अनुप शिरभाते, विनोद अजमिरे व अविनाश राजगुरे यांनी दिली.
२५ डिसेंबर नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे, जि.प.सभापती उकेश चव्हान
तेली समाज विकास मंच अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार , २३ डिसेंबर रोजी करण्यात आले असून, सर्व शाखीय तेली समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन येथील तेली समाज विकास मंचचे कार्यकर्ते संतोष शेटे यांनी केले आहे. तेली समाज विकास मंच द्वारा समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता शैक्षणिक शिबिर, स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा, उद्योजक परिषद, महिला बचत गट व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने सलग १० व्या वर्षी उस्मानाबद शहरातील ह.भ.प.मुकुंद महाराज कोरे यांच्या निवासस्थानी वैष्णव नगर वरूडा रोड येथे सकाळी १० ते १२ हरिकिर्तन होईल. या किर्तनास गुरूवर्य महादेव महाराज तांबे,व संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत. ह.भ.प. भागवत महाराज कबीर- संत कबीर महाराज फड व मठ, पंढरपूर यांचे किर्तन होईल.
दि.८ डिसेंबर २०१८ रोजी सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व तेलीसमाज बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहुन मिरवणुकीची शोभा वाढवावी आसे आव्हान करण्यात आलेले आहे.