Sant Santaji Maharaj Jagnade नागपूर : एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळाद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन महावीरनगर मैदानात करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २५ जोडप्यांचा विवाह करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, माजी खासदार नाना पटोले, वर्धा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे,
संत जगनाडे महाराजांची जयंती शासन स्तरावर खा. तडस यांनी लावून धरली होती संताजींच्या जयंतीची मागणी
अकोला - तैलीक समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या संत जगनाडे महाराज (संताजी) यांची जयंती पुढील वर्षांपासून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही साजरी केली जाणार आहे. राज्य शासनाने दोन दिवसांआधीच याबाबतचे परिपत्रक जारी केले. विशेष असे की ज्या दिवशी मागणी, त्याच दिवशी निर्णय एवढी तत्परता याकामी दाखविण्यात आली आहे.
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक Whatsapp ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी Whatsapp ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत.
तेली (तैलिक) समाजाचा वर-वधु परिचय मेळावा अमरावती जिल्हा तेली (तैलिक) समितीच्यीवतीने १६ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवनात उप वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती पत्रपरिषदेतून समिती अध्यक्ष संजय आसोले, मिलींद शिरभाते, गंगाधर आसोले, सुनिल जयसिंगपुरे, प्रकाश बनारसे, रमेशपंत शिरभाते, चंद्रशेखर पिपळे, चारुदत्त गुल्हाने, संजय रायकर, निलेश शिरभाते, अनुप शिरभाते, विनोद अजमिरे व अविनाश राजगुरे यांनी दिली.
२५ डिसेंबर नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे, जि.प.सभापती उकेश चव्हान