Sant Santaji Maharaj Jagnade तेली समाज विकास मंच अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार , २३ डिसेंबर रोजी करण्यात आले असून, सर्व शाखीय तेली समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन येथील तेली समाज विकास मंचचे कार्यकर्ते संतोष शेटे यांनी केले आहे. तेली समाज विकास मंच द्वारा समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता शैक्षणिक शिबिर, स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा, उद्योजक परिषद, महिला बचत गट व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने सलग १० व्या वर्षी उस्मानाबद शहरातील ह.भ.प.मुकुंद महाराज कोरे यांच्या निवासस्थानी वैष्णव नगर वरूडा रोड येथे सकाळी १० ते १२ हरिकिर्तन होईल. या किर्तनास गुरूवर्य महादेव महाराज तांबे,व संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत. ह.भ.प. भागवत महाराज कबीर- संत कबीर महाराज फड व मठ, पंढरपूर यांचे किर्तन होईल.
दि.८ डिसेंबर २०१८ रोजी सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व तेलीसमाज बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहुन मिरवणुकीची शोभा वाढवावी आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
एरंडेल तेली समाज समिती अमरावती जिल्हा अंतर्गत एरंडेल तेली समाज समिती बडनेरा, अमरावती, वरुडा, भातकुली यांच्या संयुक्त विद्यामाने समाजातील माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचीत समित्या यांचा सत्कार व फलक उद्घाटन सोहळा सन-२०१८-९९ रविवार दि. २ डिसेंबर २०१८ ला ठीक सायं ५ वाजता स्थळ : मराठी मुलांची शाळा, तेलीपुरा, जुनीवस्ती, बडनेरा ता.जि. अमरावती.
दि. २० अमरावती - हाल ही में महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा के विभागीय अध्यक्ष शंकरराव हिंगासपुरे, विभागीय कार्याध्यक्ष सुनील साहू व विभागीय महासचिव संजय मापले की प्रमुख उपस्थिति में संगठन के अमरावती जिला युवा अध्यक्ष पद पर भारती मनीष मोहोकार की नियुक्ति की गई.