स्व मधुकरराव सवालाखे स्मृती प्रित्यर्थ आयोजित आरोग्य तपासणी व निदान शिबीर शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 ला सकाळी 8 ते 11 पर्यंत स्थळ - संताजी प्रार्थना मंदिर, भुमीपुत्र काॅलनी, काँग्रेस नगर, अमरावती या शिबीरात तज्ञ डाॅक्टर्स मोफत तपासणी करणार आहेत. आजार - 1. डोळे तपासून चष्म्याचे नंबर काढून मिळतील.,
तिवसा तालुक्यातील सर्व तेली समाज बांधवाना हि विनंती करण्यात येत आहे की, श्री संत शिरोमनी संत जगनाडे महाराज सभागृह बांधकाम या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ दिनांक २५/०८/२०१८ रोजी. दुपारी ठिक ३ वाजता स्थळ - चिंतामनी मंदिर ,हनुमान मंदिर तिवसा येथे राज्यसभा निधी अंतर्गत, नगर पंचायत तिवसा यांच्या सौजन्याने आयोजीत केलेला आहे,
सकारात्मक मानसिकता यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी केले. मराठी तेली समाज विकास मंडळाच्या वतीने स्थानिक सातू स्थित जयभारत मंगलम् येथे १९ ऑगस्टला पार पडलेल्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती गुणगौरव व सत्कार सोहळा, कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदार श्री श्रीकांत देशपांडे आमदार शिक्षक मतदार संघ अमरावती, माननीय नामदार श्री जगदीश भाऊ गुप्ता माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, व्याख्याते माननीय श्री सुधीर महाजन प्राचार्य पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अमरावती. शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणांपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. आजचा विद्यार्थी कोणतेही शिक्षण घेत असला, तर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठा अधिकारी झाला, तर त्याचा गौरव करण्यात मला आनंद होईल. विद्यार्थी शिक्षणासोबतच राजकीय व सामाजिक घडामोडींचे ज्ञान ठेवून त्यातही करिअर करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले.