दि. 21 जानेवारी 2018 रोजी चिमूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा व उत्कृष्ट समाज कार्य करनाऱ्या तेली समाज बांधवांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नागपुर तेली समाज सामूहिक विवाह समितीच्या कार्यालयाचे उद्घाटनकरण्यात आले यावेळी तेली समाजाचे बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश भाऊ गिरडे, शेखर भाऊ सावरबांधे, रामुजी वानखेडे, अभिजीतजी वंजारी ,पुरुषोत्तमजी घाटोल, मोहन आगाशे इतर पदाधिकारी व समाजाचे नेते समाज कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते
अमरावती जिल्हा राठोड तेली समाज मंडळ द्वारा संचालित श्री संताजी भवनाचे वास्तु पुजन व श्री संताजी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा तथा भवनाचे उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. 05/02/2018 ते मंगळवार दि. 06/02/2018, स्थळ श्री संताजी भवन, हॉटेल लॉर्डस च्या बाजुला, एम. आ. डी.सी रोड, उषा कॉलनी, अमरावती (महा.) येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप
अमरावती तिवसा तेली समाज : येथिल समाज संघटनेच्या वतीने समाज बाधंधवांनी नगरपंचायत परिसरात संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व हारार्पण करून प्रसादाचे वाटप केले. संताजींचा लयघोष करीत एक स्टॉल लावून नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप करण्यात आले.
नागपुर - श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाजातील फार मोठे महान संत होते. त्यांनी स्वतः संत तुकारामांच्या अभंग गाथा स्वहस्ते लिहून त्यांचे रक्षण केले. त्यामुळेच आज सर्व विश्वामध्ये संत तुकारामांच्या अभंग गाथा आपण पाहू शकतो. या या अभंगात त्यांनी स्वतःच्या अचाट स्मरणशक्तीने लिहून काढल्या.