महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा हिंगणघाट व वर्धा जिल्हा द्वारा वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील तेली समाजाचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे एकमेव नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामदासजी तडस,अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 23-2-2019 रविवार दुपारी बारा वाजता हरिओम सभागृह हिंगणघाट इथे आयोजित करण्यात आलेला आहे.
गोंदिया दांडेगांव परिसरात सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमीत्त दि. ३१-०३-२०१९ रोज रविवारला दांडेगांव, ता.जि.गोंदिया येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यास आलेले आहे. करिता सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही विनंती. सर्व तेली समाज बांधवाना करण्यातआलेली आहे. कार्यक्रम : रविवार दि. ३१-०३-२०१९ स्थळ : बस स्टॅण्ड जवळ, दांडेगांव, ता.जि.गोंदिया
संपूर्ण देशभर तेली समाजातर्फे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी उत्साहाने केली जाते. विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ अमरावती जिल्ह्यातर्फे प्रथमच संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 28-12-2018 रोजी नंदनवन कॉलनी सुरज कॉलनीजवळ सुत गिरणी रोड अमरावती श्याम मधुकरराव हिंगासपुरे यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रम संपन्न होईल.
वर्धा : वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीयदिनाचे कार्यक्रम मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरे करण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबर रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्री जगनाडे महाराज जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ शाखा कळंब च्या वतीने आज कळंब शहरात संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी जि प सदस्य कोंडाप्पा कोरे ,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ताञय बेगमपुरे,सुर्यकांत चौधरी आदि