नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नांदेड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील कुसुम सभागृहात करण्यात आले आहे.
बुलढाणा - खामगाव - कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या एकुलत्या एकमुलाचे अपघाती निधन झाल्याने निराधार झालेल्या वृध्द माता - पित्यास महाराष्ट्र प्रांतीक तेली महिला आघाडी शाखा खामगाव यांच्यावतीने १९ जुलै रोजी ५ हजार ३०१ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. अंत्रज येथील प्रल्हाद सोनटक्के यांचा एकुलता एक मुलगा संतोष सोनटक्के यांचे ६ जुलै रोजी मुंबई येथे अपघाती निधन झाले.
परभणी हे शिक्षणाचे माहेरघर कसे बनेल यादृष्टीने आपण प्रयत्न करू असे आश्वासन आ.डॉ. राहूल पाटील यांनी दिले. तेली समाज परभणी, महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा शाखेतर्फे नवा मोंढ्यातील रोकडा हनुमान मंदिरात गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. विदर्भासह मराठवाड्यातील विद्यार्थी देखील शिक्षण घेण्यासाठी परभणीत दाखल होत आहेत. ही बाब कौतुकास्पद असून शैक्षणिक सुविधा सोई सवलती मिळाव्यात यादृष्टीने आपण निश्चीत प्रयत्न करू असे ते म्हणाले.
अमरावती दि. १४ : यावर्षी संपन्न झालेल्या शैक्षणिक सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा गुण गौरव सोहळा अमरावती जिल्हा तैलिक समिती, भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर, अमरावती तर्फे रविवार दि. २५ ऑगष्ट रोजी अभियंता भवन शेगाव नाका, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे सकाळी ११ वाजता आयोजित केलेला आहे.
विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर, शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच, व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ, प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे ,