धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपचा वापर ‘टाईमपास' म्हणून होणार नाही, यासाठी कठोर नियमही तयार केले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा दोंडाईचा. "खान्देश तेली समाचार गृप" च्या वर्धापन प्रथम वर्धापनदिनानिमित्त. दि.21/10/2018.रविवार रोजी दोंडाइचा येथे गृपच्या वतीने "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार" प्रदान करण्यात आला. त्यामध्ये सन्मान ट्राॅफी ,शाल,श्रीफळ,पुष्पहार ,प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.ह्या कार्यक्रमात सत्कार स्विकारतांना लोहारा ता.पाचोरा जि.जळगांव. येथील गृपचे पत्रकार मा.सो.श्री. दिपक वामन चौधरी.सोबत मुख्य संपादक - मा.सो.श्री.प्रकाश काशिनाथ चौधरी.दोंडाईचा.(काळा कोट घातलेले) याप्रसंगी, भोपाल M.P तेली पंच मंडळाचे सचिव,
एरंडेल तेली समाज समिती, करजगांव जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ फलक उद्घाटन सोहळा, रविवार दि. ०७/१०/१८ वेळ : सायं. ६.00 वा. स्थळ : हिंगणे प्लॉट, तेलीपूरा, करजगांव तरी सर्व समाज बांधवानी जास्ती जास्त संख्येने उपस्थित रहावे. उद्घाटक मा.श्री. प्रशांतजी तु. कांबळे अध्यक्ष, विदर्भ एरंडेल तेली समाज, विशेष अतिथी मा.श्री. दिपकजी निंभोरे कार्याध्यक्ष, विदर्भ एरंडेल तेली समाज मा.सौ. योगिताताई म. जयस्वाल सदस्य,
दि:०७/१०/२०१८ रोजी तेली समाज धाराशिव सचिव व मा. नगरसेवक अँड विशाल साखरे व रॉबिनहूड आर्मी उस्मानाबाद मार्फत मधूबन कुष्ठधाम उस्मानाबाद येथे सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा आदरणीय श्री डॉ. दिग्गज दापके-देशमुख सर,डॉ.सतीश गवाड सर आणि दादासाहेब कोरके सरांच्या सहकार्याने आणि पोलीस उपनिरीक्षक श्री सोहन धोत्रे सरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.
सर्व तेली समाज बंधु - भगिनींना नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की दि. ३० सप्टे. २०१८ रविवार ला विदर्भ तेली समाज महासंघ, नागपूर संघटनेचे अधिवेशन आयोजीत केले आहे. वेळ : रविवार, दि. ३० सप्टेबर २०१८ ला दू. १२:०० वा. स्थळ : सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड नागपूर या अधिवेशनाला विदर्भातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी व नागपूर महानगरातील बंधु-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.