आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात.
आई तुळजाभवानीच्या सर्वच प्रथा परंपरा या जगावेगळ्या असून त्यात सर्वसमावेशकता आहे. अहमदनगरजवळील बुर्हाणनगर हे तुळजाभवानीचे माहेर म्हटले जात असल्याने त्याठिकाणचा जानकोजी तेली हा तिच्या पित्यासमान मानून माहेरवासिनीचा सन्मान म्हणून सीमोल्लंघनासाठी तुळजाभवानीची मूळ मूर्तीची मिरवणूक ही याच तेल्याच्या पालखीतून काढली जाते. हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आल्याची माहिती पालखीचे मानकरी अॅड. अभिषेक विजयराव भगत यांनी सविस्तरपणे कथन केली. विशेष म्हणजे ही परंपरा चालविणारे ते ३० वे वंशज आहेत.
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाची बैठक बडनेरा जुनी वस्ती तेलीपूरा शीव मंदीर येथे पार पडली बैठकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे पूजन करण्यात आले. संताजी महाराजांचे पूजन झाल्या नंतर मान्यवर वक्त्यची समाज उधबोधन पर भाषने झाली.कार्यक्रमा मध्ये दहावी व बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीचां सत्कार संताजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला.
दिनांक 23 जून 2019 रोजी, 8 डिसेंबर 2019 रोजी होणार्या तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती निमित्त पूर्वनियोजित बैठक संत नगरी शेगाव येथे घेण्यात आली, तरी सर्व संताजीभक्तजण उपस्थित होते, संताजी नवयुवक मंडळ अध्यक्ष नागपूर मा. श्री सुभाषजी घाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, राष्ट्रीय तेली समाज महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री नागपूर सौ. मंजू ताई कारेमोरे,
नगर, ता .२३ - तुळजाभवानी मातेस मुलगी समजल्या जाणाऱ्या भगत कुटुंबियांकडून महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची इतिहासामध्ये प्रथमच श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासनवर १११११ हापूस आंबेची देवीला पूजा मांडली गेली, तसेच देवीच्या मुख्य मंदिरासह भवानीशंकर खंडेराया नरसिंह मंदिर येमाई मंदिर दत्त मंदिर या सर्व मंदिरात देखील पूजा केल्यानंतर भाविकांनी देवीची विशेष पूजा पाहण्याकरिता मोठया प्रमाणात गर्दी केली होती.